

मुंबई शहरात मोठा राडा
भाजप आमदाराने तस्कराला पकडलं
आमदाराने तस्कराला दिलं पोलिसांच्या ताब्यात
संजय गडदे, साम टीव्ही
मुंबईत शनिवारी रात्री मोठा राडा झाला. मुंबईत गांजा तस्कराला भाजप आमदाराने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. यावेळी आमदाराच्या कार्यकर्त्याने तस्कराला माराहण केल्याची माहिती मिळतेय. त्यानंतर आमदाराने तस्कराला पोलिसांच्या ताब्यात दिले.
मुंबईतील बोरिवली भागात हा मोठा गदारोळ पाहायला मिळाला. भाजप आमदार संजय उपाध्याय आणि भाजप कार्यकर्त्यांनी गांजा, दारू आणि गुटख्याची तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीला रंगेहाथ पकडले. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी संबंधित तस्कराला मारहाण केल्याची घटना घडली. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
भाजप आमदाराकडून तस्काराला मारहाण सुरू असताना दुसराही धक्कादायक प्रकार घडला. भाजप आमदार संजय उपाध्याय आणि भाजप कार्यकर्त्यांनी एका व्यक्तीला पकडलं. या व्यक्तीवर बॉटलमध्ये मूत्र साठवून परिसरातील लोकांवर ओतत असल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
भाजप आमदार उपाध्याय यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणात दोन्ही संशयितांना ताब्यात घेतलं आहे. या दोघांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे बोरिवली परिसरात मोठा खळबळ उडाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये अमली पदार्थ तस्करीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. तलवारीच्या म्यानमध्ये एमडी ड्रग्ज लपवून ठेवल्याचा प्रकार गुन्हे शाखेच्या कारवाईत समोर आलाय. चार दिवसांपूर्वी अटक करण्यात आलेला कुख्यात गुन्हेगार आणि शहरातील अमली पदार्थांचा मुख्य तस्कर शेख अशपाक शेख पटेल याचा निकटवर्तीय मित्र शेख कलीम शेख सरदार याने घराच्या पत्र्यावर ठेवलेल्या तलवारीच्या म्यानमध्ये ड्रग्ज लपवले होते.
गुन्हे शाखेच्या पथकाने ही तलवार आणि म्यानची झडती घेतली असता त्यामध्ये तब्बल ३३ पुड्या आढळून आल्या. या पुड्यांमध्ये एकूण २०.६९ ग्रॅम एमडी अमली पदार्थ असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही कारवाई शहरातील ड्रग्ज तस्करांविरोधातील मोहिमेला मोठे यश मानले जात आहे. याप्रकरणी पुढील तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.