कामाला जायची घाई नडली, तरुणी जीवाला मुकली; काळीज पिळवटून टाकणारा CCTV व्हिडिओ

badlapur accident cctv : लोकल ट्रेन पकडताना तरुणीचा अपघाती मृत्यू झाला. या घटनेचा काळीज पिळवटून टाकणारा CCTV व्हिडिओ समोर आला आहे.
badlapur local train
badlapur accident cctvSaam tv
Published On
Summary

बदलापुरातील रेल्वे अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर

लोकलखाली सापडून 28 वर्षीय महिलेचा मृत्यू

ही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात

मयुरेश कडव, साम टीव्ही

बदलापुरात दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे बदलापुरातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळते. प्रवाशांना डब्यात उभे राहण्यासाठी पुरेसी जागा नसते. अशीच प्रवाशांनी भरलेली लोकल ट्रेन पकडताना तरुणीचा तोल गेला. त्यानंतर तरुणीचा लोकलखाली पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातानंतर स्टेशनवर एकच खळबळ उडाली. या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे.

चेतना चंद्रशेखर देवरुखकर असं या तरुणीचं नाव आहे. बदलापूर स्टेशनवर आज शनिवारी सकाळी 8 वाजून 11 मिनिटांची सीएसएमटी लोकल पकडताना ही दुर्दैवी घटना घडली. 28 वर्षीय चेतना ही जुवेली येथील जगन्नाथ गॅलेक्सीत वास्तव्याला होती. वर्षभरापूर्वीच तिचं लग्न झालं होतं.

नेमकं काय घडलं?

चेतना चंद्रशेखर देवरूखकर ही तरुणाला नोकरीला जाण्याच्या घाईत होती. ती सकाळी  8 वाजून 11 मिनिटांची सीएसएमटी लोकल पकडण्यासाठी स्टेशनवर आली. लोकल ट्रेन निघाल्यानंतर तिने स्टेशनवर पाय ठेवला. त्यामुळे घाईघाईत धावती लोकल ट्रेन पकडण्याचा प्रयत्न केला.

badlapur local train
'मशाली'वर निवडून आले, पण आदेश मोडले; बेपत्ता ४ नगरसेवकांवर ठाकरेंचा निलंबनाचा इशारा

धावती लोकल पकडण्याच्या प्रयत्नात ही तरूणी प्लॅटफॉर्मवरून खाली पडली. त्यानंतर लोकलखाली सापडल्यानं तिचा जागीच मृत्यू झाला. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ज्याठिकाणी प्लॅटफॉर्म संपलाय. त्याच ठिकाणी या महिलेनं लोकल पकडण्याचा प्रयत्न केला. त्यात तिचा तोल गेला. या घटनेत तरुणीचा जागीच मृत्यू झाला.

badlapur local train
राष्ट्रवादी काँग्रेसचे २ ठराव पास, तटकरेंची महत्वाची भूमिका; सुनेत्रा पवारांना कोणती मोठी जबाबदारी मिळाली?

तरुणी ट्रेनखाली गेल्यानंतर स्टेशनवरील इतर प्रवासी तातडीने घटनास्थळी पोहोचले. तिला लोकल ट्रेन खालून बाहेर काढले. पोलीस देखील घटनास्थळी पोहोचले. चेतनाचा मृतदेह काढून रुग्णालयात पाठवण्यात आला. तरुणीच्या मृत्यूनंतर रेल्वे प्रवाशांच्या प्रवासाचा जीवघेणा संघर्ष पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com