

अर्थसंकल्पात दारू आणि सिगारेटचे दर वाढलेत
भाववाढीवर तरुणांमकडून संमिश्र प्रतिक्रिया
काहींनी व्यसनमुक्तीसाठी केलं निर्णयाचं समर्थन
काहींनी दरवाढीचा निर्णय आर्थिक बोजा असल्याचं म्हटलंय
देशाच्या अर्थसंकल्पात दारू आणि सिगारेटच्या दरात वाढ झाली आहे. भाववाढीवर तरुणांनी नाराजी दर्शवली आहे. तर काहींनी भाववाढीला समर्थन दिलं आहे. दारू आणि सिगारेटचे दर स्वस्त असल्याने तरुण नशेच्या आहारी चालले होते, असं काहींचं म्हणणं आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, एका तरुणाचं म्हणणं आहे की, 'दारू आणि सिगारेटच्या किंमती वाढल्यानंतर लोक विचार करून खर्च करतील. त्यामुळे लोक व्यसनाच्या आहारी कमी जातील. सरकारच्या निर्णयाने तरुण पीढी आता शिक्षण, नोकरी आणि भविष्याविषयी जास्त विचार करतील. दारूच्या व्यसनामुळे आरोग्यासहित करिअरवरही परिणाम होतो'.
'सरकारने उशिरा निर्णय घेतला. पण योग्य निर्णय घेतलाय. यामुळे समाजामध्ये चांगला संदेश जाईल,असे एका तरुणाचं म्हणणं आहे. दुसऱ्या तरुणाने सरकारच्या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. 'धान्य, भाजी, गॅस आणि घरात दररोज लागणाऱ्या वस्तू महागल्या आहेत. दुसरीकडे दारू आणि सिगारेटचे दर वाढवणे म्हणजे सर्वसामन्यांवर आणखी कर लादण्यासारखं आहे, असेही त्याने म्हटलं.
दिनेश नावाच्या तरुणाने सरकारच्या निर्णयाला चुकीचं ठरवलं आहे. 'मित्रांसोबत हॉटेलमध्ये गेल्यावर कधी कधी मद्यसेवन करतो. जुने मित्र भेटल्यानंतर एखाद्या वेळी मद्यसेवन करणे म्हणजे नशेच्या आहारी जाणे नव्हे. या निमित्ताने मित्रांसोबत वेळ घालवता येतो. परंतु आता सरकारने अधिक कर लावून दारू महाग केली आहे, असे दिनेशने सांगतिले. तरुणांनी केलेल्या अर्थसंकल्पावरील टीकेवर भाजप नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येते, हे पाहावे लागेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.