

नागपूर महापालिकेत भाजपनं आपलं वर्चस्व कायम राखलेलं असताना पक्षनिष्ठेसाठी नवा वस्तुपाठच घालून दिलाय...भाजपचे गटनेते नरेंद्र बोरकर यांच्या सूचनेनुसार, भाजपच्या 102 नगरसेवकांनी आपले राजीनामे पक्षाकडे सुपूर्द केलेत... मात्र महापौरनिवडीआधीच भाजपनं आपल्याच नगरसेवकांचे राजीनामे का घेतले पाहूयात...
कोणताही नगरसेवक पक्षविरोधी भूमिका घेणार नाही यासाठी तसचं नगरसेवकांचे वर्तन जनमानसात पक्षाची प्रतिमा मलीन करणारे नसावे यासाठी राजीनामे आधीच लिहून घेतले जातात.. इतकचं काय तर शिस्तभंग झाल्यास कायदेशीर प्रक्रियेची वाट न पाहता तात्काळ राजीनाम्याचा निर्णय घेता यावा म्हणून पक्षानं राजीनाम्याचा निर्णय घेतलाय...
दरम्यान संघाचं मुख्यालय असलेलं नागपूर हे भाजपचा बालेकिल्ला मानलं जातं... त्यामुळे इथं पक्षशिस्त, जबाबदारी आणि संघटनात्मक नियंत्रणाला विशेष महत्त्व आहे.. अशातच भाजपनं 21 आणि 24 वर्षीय नवनिर्वाचित नगरसेवकांचेही राजीनामे लिहून घेतलेत.. त्यामुळे ही काही नवीन बाब नाही... नागपुरात 1997 पासून जेव्हा सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा नगरसेवक झाले होते, तेव्हापासून हे राजीनामा सत्र असेच सुरु आहे...
नागपूर भाजपचा हा 'राजीनामा पॅटर्न' राज्यातील इतर राजकीय पक्षांसाठी एक धडा ठरू शकतो. सत्ता असो वा नसो, संघटनेवरची पकड ढिली होऊ नये, हाच संदेश यातून दिला गेलाय. आता या शिस्तीचा फायदा नागपूरच्या विकासकामांत किती होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.