Maharashtra rain: राज्यात मान्सूनला मोठा ब्रेक; 'या' कारणामुळे गायब झाले ढग, हवामान खात्याचा नवीन अंदाज काय?

Maharashtra Weather News : महाराष्ट्रात मान्सूनला अचानक ब्रेक का लागला? एल निनोमुळे पावसाचे ढग का गायब झाले, १९ जुलैपर्यंत हवामान कसे राहणार, कोणत्या भागात पाऊस कमी होणार आणि खरीप पिकांवर काय परिणाम होणार?
Maharashtra Weather Update
Maharashtra Weather UpdateSaam TV AI Image
Published On

Maharashtra Weather Update : जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यात दमदार हजेरी लावत मान्सूनने जून महिन्यातील पावसाची तूट भरून काढली होती. त्यामुळे बळीराजा सुखावला होता. मात्र, हा दिलासा आता फार काळ टिकण्याची शक्यता नाही. कारण राज्यामध्ये मान्सूनच्या प्रवासाला पुन्हा एकदा अचानक ब्रेक लागला आहे. त्यामुळे पावसामध्ये मोठा खंड पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

अलनिनो ठरतोय कारणीभूत

प्रशांत महासागरामध्ये 'अल निनो' (El Nino) पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. याचा थेट परिणाम मान्सूनच्या गतीवर झाला आहे. तसेच अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा कमकुवत झाल्यामुळे मान्सूनचे ढग गायब झाले आहेत. त्यामुळे १० ते १५ जुलै दरम्यान राज्यातील पावसाचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटणार आहे. पुढील काही दिवस पाऊस गायब होऊन उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे.

१९ जुलैपर्यंत उघडीप मिळण्याची शक्यता

ज्येष्ठ हवामान अभ्यासकांच्या मते, मान्सून सध्या काहीसा उत्तरेकडे सरकला आहे. परिणामी, १० जुलैपासूनच मुंबई आणि कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा जोर लक्षणीय ओसरला आहे. पुढील १० दिवस म्हणजेच १९ जुलैपर्यंत मुंबई-कोकणात मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल, तर उर्वरित महाराष्ट्रात पावसाची मुख्यत्वे उघडीप राहण्याची शक्यता आहे.

Maharashtra Weather Update
Washim : निकाल लागला अन्...; शासकीय नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनीने संपवलं आयुष्य!

खरीप पिके धोक्यात, दुबार पेरणीचे संकट?

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आता पाऊस सलग न पडता मोठा खंड घेत पडणार आहे. पावसाने अशीच ओढ दिल्यास राज्यातील खरीप पिके धोक्यात येण्याची भीती आहे. तसेच शेतकऱ्यांवर दुबार किंवा तिबार पेरणीचे संकट ओढवू शकते, ज्यामुळे बळीराजाच्या चिंतेत मोठी भर पडली आहे.

Maharashtra Weather Update
Tukaram Mundhe : इतर राज्यांनाही हवा महाराष्ट्रातील 'मुंढे पॅटर्न'; देशभरातील बडे अधिकारी दौरा करणार?

पाऊस पुन्हा कधी सक्रिय होणार?

सध्या पाऊस गायब झाला असला तरी जुलै महिन्याच्या अखेरीस मान्सून राज्यात पुन्हा एकदा सक्रिय होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र, तोपर्यंतच्या कालावधीत पिकांना पाण्याचा तुटवडा भासण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हवामान विभागाच्या (IMD) मते, प्रशांत महासागरात 'सुपर अल निनो' सक्रिय झाल्याने समुद्रावरील वारे कमकुवत झाले आहेत. जुलैच्या सुरुवातीला झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या होत्या. मात्र आता अचानक १० ते १५ दिवसांचा खंड पडल्यास कोवळी पिके जळून जाण्याची भीती आहे.

Maharashtra Weather Update
राज्यात खळबळ! सत्ताधारी आमदाराच्या भावाने तरुणाला भररस्त्यात झोडपले; घटना CCTV मध्ये कैद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com