Washim : निकाल लागला अन्...; शासकीय नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनीने संपवलं आयुष्य!

Washim latest news : वाशीम येथील शासकीय नर्सिंग महाविद्यालयातील बीएससी नर्सिंगच्या द्वितीय वर्षातील विद्यार्थिनीचा भाड्याच्या खोलीत मृत्यू झाला. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला.
Washim BSc Nursing student death
Washim BSc Nursing student deathSaam TV marathi
Published On

मनोज जैयस्वाल | वाशिम प्रतिनिधी | साम टीव्ही मराठी

Washim BSc Nursing student death investigation : वाशीम येथील शासकिय नर्सिंग महाविद्यालयात बीएससी नर्सिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नेत्रा लाड असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती कारंजा तालुक्यातील मोहगव्हाण येथील रहिवासी होती. या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

भाड्याच्या खोलीत घेतला गळफास

शिक्षणासाठी नेत्रा वाशीममधील गव्हाणकर नगर भागात एका भाड्याच्या खोलीत राहत होती. तिने खोलीतच टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच वाशीम शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

Washim BSc Nursing student death
Eknath Shinde : शिवसेनेला खिंडार! एकनाथ शिंदेंना जोरदार धक्का, नाराज नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

निकालाचा तणाव की अन्य काही कारण?

नुकताच बीएससी नर्सिंगचा निकाल लागला असून, या निकालात आलेल्या अपयशामुळे किंवा कमी गुणांमुळे नेत्रा गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली असल्याची चर्चा प्राथमिक स्तरावर सुरू आहे. मात्र, तिच्या खोलीत कोणतीही सुसाईड नोट सापडली आहे का, किंवा आत्महत्येचे नेमके कारण काय, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी सध्या तरी निकालाच्या कारणाला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

Washim BSc Nursing student death
Tukaram Mundhe : इतर राज्यांनाही हवा महाराष्ट्रातील 'मुंढे पॅटर्न'; देशभरातील बडे अधिकारी दौरा करणार?

पोलिसांचा तपास सुरू

या घटनेनंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू केला आहे. नेत्राच्या खोलीतील वस्तू आणि मोबाईलचीही तपासणी केली जाण्याची शक्यता आहे. तिच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती देण्यात आली असून, त्यांच्या जबाबानानंतर काही नवीन माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

टीप: मानसिक तणावाशी झगडत असाल तर मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्या. जिल्हा सामान्य रुग्णालय किंवा मानसोपचार हेल्पलाईनशी संपर्क साधा.

Washim BSc Nursing student death
स्मार्ट मीटर बसण्यापूर्वीच ४४० व्होल्टचा झटका; पाठवलं ५ महिन्यांचं वीजबिल, धक्कादायक प्रकरणाने राज्यात खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com