Tukaram Mundhe : इतर राज्यांनाही हवा महाराष्ट्रातील 'मुंढे पॅटर्न'; देशभरातील बडे अधिकारी दौरा करणार?

Maharashtra FDA : महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईची देशभरात चर्चा सुरू आहे. तेलंगणा, कर्नाटकसह अनेक राज्यांतील वरिष्ठ अधिकारी 'मुंढे पॅटर्न'चा अभ्यास करत असल्याची माहिती समोर आली आहे.
Tukaram Mundhe, Maharashtra FDA
Tukaram Mundhe, Maharashtra FDASaam TV
Published On

Tukaram Mundhe FDA action in Maharashtra : दूध, पनीरपासून ते सौंदर्य प्रसाधनं आणि प्रत्येक पदार्थातील भेसळखोरीचा पर्दाफाश करणारे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त IAS अधिकारी तुकाराम मुंढेंची महाराष्ट्रासह देशभरात जोरदार चर्चा आहे. राज्यभरात सध्या एफडीएचं धाडसत्र सुरूच आहे. पानटपरीपासून हॉटेल आणि मिठाई दुकान चालकांनी तर मुंढेंचा धसकाच घेतला आहे. मध्यंतरी मुंढे धाड टाकतील म्हणून काहींनी तर टपऱ्या बंद केल्या. आता महाराष्ट्रातील एफडीए कारवाईचा हा 'मुंढे पॅटर्न' देशभरातील इतर राज्यांतील अधिकाऱ्यांनाही हवाहवासा वाटू लागला आहे. तेलंगणा, कर्नाटकसारख्या राज्यांसह इतर राज्यांतही हा 'मुंढे पॅटर्न' राबवण्यासाठी तेथील बड्या अधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून कळते.

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अन्न व औषध प्रशासनाच्या अर्थात एफडीएच्या धाडी पडत आहेत. त्यामुळं अनेक हॉटेल चालकांसह भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत. भेसळ, बनावट वस्तू विक्री करणाऱ्यांविरोधात तुकाराम मुंढेंनी मोहीम राबवली आहे. हाच त्यांचा पॅटर्न आता देशभरात राबवला जाऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितलेय.

तुकाराम मुंढे सध्या अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. पदभार स्वीकारताच त्यांनी या विभागातही आपला नेहमीचा अॅक्शन मोड सुरू केला आहे. बेकायदेशीर बांधकामे, टॅक्स चोरी आणि भ्रष्टाचाराविरोधात नेहमीच कडक पावले उचलणाऱ्या मुंढेंनी FDA चा मोर्चा सांभाळताच भेसळ करणारे आणि नियमबाह्य व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. सध्या राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाकडून ज्या धाडी टाकल्या जात आहेत, त्यामागे आयुक्त तुकाराम मुंढे यांचीच अचूक रणनीती आणि कडक आदेश आहेत.

Tukaram Mundhe, Maharashtra FDA
स्मार्ट मीटर बसण्यापूर्वीच ४४० व्होल्टचा झटका; पाठवलं ५ महिन्यांचं वीजबिल, धक्कादायक प्रकरणाने राज्यात खळबळ

बदली कुठल्याही विभागात झाली तरी तिथला कारभार ताळ्यावर कसा आणायचा, याचे उत्तम उदाहरण मुंढेंनी पुन्हा एकदा घालून दिले आहे. त्यांच्या या धडाकेबाज कामगिरीची दखल आता केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर राष्ट्रीय पातळीवर घेतली जात आहे. अन्न व औषध प्रशासनाचा कायापालट करणाऱ्या 'मुंढे पॅटर्न'ची माहिती घेण्यासाठी इतर अनेक राज्यांमधील बड्या आयएएस अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी थेट संपर्क साधल्याची माहिती सूत्रांकडून कळते.

Tukaram Mundhe, Maharashtra FDA
Covid-19 Death : भारतात पुन्हा कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची एन्ट्री, ४६ वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू

मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार, देशातील इतर अनेक राज्यांच्या FDA आयुक्तांनी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थेट तुकाराम मुंढे यांच्याशी संपर्क साधल्याचे कळते. आपल्या राज्यातही अन्न आणि औषध विभागाचा कारभार पारदर्शक आणि कडक करण्यासाठी या अधिकाऱ्यांनी 'मुंढे पॅटर्न' नेमका काय आहे आणि त्याची अंमलबजावणी कशी करायची, हे समजून घेण्यासाठी महाराष्ट्राचा दौरा करण्याचाही विचार केला जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

महाराष्ट्रात तुकाराम मुंढेंच्या मार्गदर्शनाखाली धडाकेबाज कारवाई सुरू आहे. तशाच प्रकारच्या मोहिमा देशातील इतर राज्यांमध्येही पाहायला मिळू शकतात. कारण, राज्याच्या शेजारील काही एफडीए अधिकाऱ्यांनी तुकाराम मुंढेंशी संपर्क साधल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नियम धाब्यावर बसवून सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना चाप लावण्यासाठी इतर राज्यांचे अधिकारीही आता 'मुंढे पॅटर्न'च्या तयारीत असल्याचे समजतेय. आगामी काळात देशभरातील अन्न व औषध प्रशासन विभागात मोठे फेरबदल पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Tukaram Mundhe, Maharashtra FDA
रंग गोरा करण्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानी क्रीममागे दहशतवाद्यांचा काळा चेहरा? नांदेडमधील FDA कारवाईनंतर ATS ची एन्ट्री होणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com