राज्यात खळबळ! सत्ताधारी आमदाराच्या भावाने तरुणाला भररस्त्यात झोडपले; घटना CCTV मध्ये कैद

Kiran Lahamate cousin assault case Video : अकोले तालुक्यातील राजूर बाजारपेठेत एका तरुणाला आमदार किरण लहामटे यांचे चुलत भाऊ आणि स्वीय सहाय्यक मुकुंद लहामटे यांनी कथितरित्या मारहाण केल्याचा आरोप आहे.
Kiran Lahamate cousin assault case Video
Kiran Lahamate cousin assault case VideoSaam TV
Published On

सचिन बनसोडे, अहिल्यानगर प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

Kiran Lahamate latest news : अहमदनगरमधील अकोले तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अकोलेचे आमदार किरण लहामटे यांचे चुलत भाऊ आणि स्वीय सहाय्यक (PA) मुकुंद लहामटे यांनी राजूर बाजारपेठेत एका तरुणाला भररस्त्यात फिल्मीस्टाईल बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. ६ जुलै रोजी घडलेल्या या संपूर्ण मारहाणीचा थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोले तालुक्यातील राजूर बाजारपेठेत मुकुंद लहामटे यांनी एका तरुणाला रस्त्यात अडवले. एका किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. मुकुंद लहामटे यांनी काही विचार न करता या तरुणाला भरबाजारपेठेत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. आमदाराच्या भावानेच कायदा हातात घेऊन सामान्य तरुणाला फिल्मीस्टाईलने मारहाण केल्याने राजूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Kiran Lahamate cousin assault case Video
Eknath Shinde : शिवसेनेला खिंडार! एकनाथ शिंदेंना जोरदार धक्का, नाराज नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

मारहाणीची ही संपूर्ण घटना एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली आहे. ६ जुलैची ही घटना असली तरी याचा व्हिडिओ आता समोर आल्याने तालुक्यात राजकीय आणि सामाजिक वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. सत्ताधारी आमदाराच्या नातेवाईकाकडून झालेल्या या गुंडगिरीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Kiran Lahamate cousin assault case Video
Pune : खाकी डागाळली! PSI चे तरूणीवर लैंगिक अत्याचार; पोलीस उपनिरीक्षकासह दोघांवर गुन्हा दाखल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com