Rain : पुढील २४ तास अत्यंत मुसळधार! ८ राज्यांमध्ये अति-मुसळधार पावसाचा हायअलर्ट; महाराष्ट्रात हवामानाचा काय अंदाज?

Maharashtra Weather Update: पुढील ४८ तासांत देशातील ८ राज्यांमध्ये मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा इशारा आहे. महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्राचा हवामान अंदाज जाणून घ्या.
Maharashtra Weather: परतीच्या पावसाचा धुमाकूळ,
Maharashtra RainSaam tv
Published On: 

IMD heavy rain alert for next 48 hours : शनिवारी देशातील अनेक प्रमुख राज्यांमध्ये मुसळधार ते अती-मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने (IMD) जारी केलाय. ओडिशा आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या हवामान प्रणालीमुळे महाराष्ट्र, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यात वादळी पावसाची शक्यता आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. काही राज्यांमध्ये वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा यलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि मराठवाड्यातील काही भागांत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याशिवाय मुंबई, ठाणे, पालघरसह कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, नाशिक घाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.

Maharashtra Weather: परतीच्या पावसाचा धुमाकूळ,
Mayor Election Results : महापौर निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय, काँग्रेसचा सुपडासाफ; कुणाला कुठे किती मते मिळाली?

पुढील २४ तासांत येथे मुसळधार पाऊस पडेल

हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, २५-२६ सप्टेंबर दरम्यान उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड आणि सिक्कीममध्ये सर्वत्र पावसाचा अंदाज आहे. या काळात वारे ताशी ४०-५० किमी वेगाने वाहू शकतात. २६-२७ सप्टेंबर दरम्यान पूर्व उत्तर प्रदेश, पंजाब आणि पश्चिम उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. २७-२८ सप्टेंबर रोजी उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

Maharashtra Weather: परतीच्या पावसाचा धुमाकूळ,
Accident : भीषण अपघातात एकाच क्षणात ६ जणांचा करुण अंत, ७ गंभीर; महामार्गावरील दृश्य पाहून पोलीसही हादरले

ईशान्येकडील राज्यांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता

आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये पुढील २ दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. २६ सप्टेंबर रोजी केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि यानममध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, २६ सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ४०-५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. २७ ते ३० सप्टेंबर दरम्यान केरळ, माहे आणि लक्षद्वीपमध्ये पावसाची शक्यता आहे, तर किनारपट्टीवरील कर्नाटकात २६ ते २९ सप्टेंबर दरम्यान पाऊस पडू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com