Accident : भीषण अपघातात एकाच क्षणात ६ जणांचा करुण अंत, ७ गंभीर; महामार्गावरील दृश्य पाहून पोलीसही हादरले

Chhattisgarh accident news : छत्तीसगडमधील बालोद जिल्ह्यात NH-30 वर बोलेरो आणि ट्रॅक्टर-ट्रॉलीची भीषण धडक झाली. या अपघातात ६ जणांचा मृत्यू, तर ७ जण गंभीर जखमी झाले आहेत.
Chhattisgarh accident Death Toll
Chhattisgarh accident Death Toll
Published On: 

Chhattisgarh accident Death Toll : छत्तीसगडमधील बालोद जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग-३० (NH-30) वर भीषण अपघात झाला आहे. जगतरा गावाजवळ भरधाव बोलेरो गाडी आणि ट्रॅक्टर-ट्रॉली यांच्यात झालेल्या भयंकर धडकेत ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती.

स्थानिक मीडियाने दिलेल्या मिळालेल्या माहितीनुसार, बोलेरो गाडीतील सर्व प्रवाशी एका कार्यक्रमावरून परत घराकडे जात होते. त्यावेळीच काळाने घाला घातला. जगतरा गावाजवळ रस्त्यावरून जाणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला भरधाव बोलेरोने मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की बोलेरो गाडीच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला. अपघातानंतर गाडीत प्रवासी अडकले होते.

Chhattisgarh accident Death Toll
₹२००० पेक्षा जास्त UPI व्यवहारांवर कुणाला चार्ज लागणार? अर्थमंत्र्यांनी दिले स्पष्ट उत्तर; पाहा तुमच्यावर काय होणार परिणाम

स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत पोलिसांना या अपघाताची माहिती दिली आणि बचावकार्य सुरू केले. घटनेची माहिती मिळताच पुरुर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक आणि रुग्णवाहिकेच्या मदतीने गाड्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Chhattisgarh accident Death Toll
Mayor Election Results : महापौर निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय, काँग्रेसचा सुपडा साफ; कुणाला कुठे किती मते मिळाली?

या अपघातात जखमी झालेल्या ७ जणांना तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा सविस्तर तपास करत असून मृतदेहांचे पोस्टमार्टम केले जात आहे. पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com