Rajasthan Mayor Election Results : राजस्थानमधील प्रमुख ३ महापालिकांच्या महापौर निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. या निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. काँग्रेसला मात्र पराभवाचा सामना करावा लागला. जयपूर, जोधपूर आणि कोटा या तिन्ही प्रमुख महापालिकांमध्ये भाजपने महापौर निवडून आणलाय. क्रॉस व्होटिंगमुळे काँग्रेसचा दारुण पराभव झाल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या जोधपूरमध्येही भाजपच्या उमेदवाराने बाजी मारली आहे, तर काँग्रेसला येथे खातेही उघडता आले नाही.
राजस्थानमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवत विरोधकांचा धुव्वा उडवला आहे. नुकत्याच पार पडलेल्या महापौर पदाच्या निवडणुकीत जयपूर, जोधपूर आणि कोटा या तिन्ही प्रमुख शहरांमध्ये कमळ फुलले आहे. पण काँग्रेसला दारूण पराभवाचा सामना करावा लागला.
कोटा नगरनिगममध्ये भाजपच्या अनुसुईया गोस्वामी यांनी दणदणीत विजय मिळवला. त्यांनी काँग्रेसच्या उमेदवार सुनीता सुमन यांचा ३० मतांनी पराभव केला. १०० जागांच्या या सभागृहात भाजपचे ५७ नगरसेवक होते, तर काँग्रेसकडे ३९ नगरसेवक होते. पण काँग्रेसच्या उमेदवाराला ३७ मतेही मिळाली नाहीत. काँग्रेस उमेदवाराला फक्त ३२ मते मिळाली.
जोधपूरमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. भाजपचे प्रसन्नचंद मेहता यांनी विजय मिळवत काँग्रेसचे दिग्गज नेते राजेंद्र सोळंकी यांचा पराभव केला. काँग्रेसच्या हातून हा महत्त्वाचा गड हिरावून घेतला. प्रसन्नचंद मेहता यांना ५३ मते मिळाली. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र सोळंकी यांचा ६ मतांच्या फरकाने पराभव केला.
जोधपूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपने ४५ जागा, तर काँग्रेसने ४४ जागा जिंकल्या होत्या. राष्ट्रीय लोक दलाच्या (राष्ट्रीय लोकतांत्रिक दल) एका उमेदवाराने एक जागा जिंकली होती. त्याशिवाय १० अपक्ष नगरसेवकही विजयी झाले होते. महापौरपदाच्या निवडणुकीत अपक्ष नगरसेवकांनी भाजप उमेदवाराच्या पारड्यात मत टाकल्याने काँग्रेसचा जोधपुरचा गढ ढासळला.
जयपूरमध्ये स्पष्ट बहुमत असलेल्या भाजपने सहज विजय मिळवत महापौरपदावर नाव कोरले. सुनील कोठारी जयपूर महानगरपालिकेचे नवे महापौर झाले. महापौरपदासाठी सुनील कोठारी यांना ८९ मते मिळाली, तर काँग्रेसच्या सुनीता मावर यांना ६० मते मिळाली. कोठारी यांना त्यांच्या पक्षाच्या नगरसेवकांच्या मतांसह ११ मते मिळाली आणि त्यांनी बहुमताचा आकडा पार केला. एआयएमआयएमकडे असलेले एक अल्पमताचे मत 'नोटा'ला मिळाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.