Maharashtra Politics: मोठी बातमी! भाजपच्या बड्या नेत्याविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई, राजकीय वर्तुळात खळबळ

BJP Leader Ramdas Zhol Under MCOCA Action: भाजपच्या बड्या नेत्याविरोधात सोलापूर पोलिसांनी मोठी कारवाई केली. रामदास झोळसह ८ जणांविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली.
Maharashtra Politics: मोठी बातमी! भाजपच्या बड्या नेत्याविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई, राजकीय वर्तुळात खळबळ
BJP Leader Ramdas Zhol Under MCOCA ActionSaam Tv
Published On: 
  • मनोहर मामा भोसले प्रकरणाच्या तपासाला नवे वळण

  • भाजप नेते आणि दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामदास झोळविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई

  • भोंदू मनोहर मामा आणि भाजप नेता रामदास झोळ, त्याची पत्नी माया झोळ यांच्यासह ८ जणांवर मोक्काअंतर्गत कारवाई

  • मनोहर मामा आणि रामदास झोळ यांच्यात कथित आर्थिक संबंध असल्याचा तपासातून उघड

राज्यभर चर्चेत असलेल्या स्वयंघोषिक आध्यात्मिक गुरू आणि भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात भोंदू मनोहर मामा आणि भाजप नेता रामदास झोळ या दोघांविरोधात मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सोलापूर ग्रामिण पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी ही कारवाई केली. स्वत:ला बाळूमामाचा अवतार असल्याचे सांगत भविष्य बदलण्याचे आमिष दाखवत मनोहर मामा भक्तांची फसवणूक करायचा. त्याच्याविरोधात आर्थिक फसवणूक, भोंदूगिरी आणि बलात्कारासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो सध्या आर्थिक फसवणूक प्रकरणात अटकेत आहे.

सोलापूर पोलिसांनी भोंदूबाबा मनोहर मामा प्रकरणात आज मोठी कारवाई केली. भोंदू मनोहर मामा, त्याचा साथीदार, भाजप नेता रामदास झोळ, त्याची पत्नी माया झोळ यांच्यासह एकूण ८ जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली. भोंदू मनोहर मामा आणि रामदास झोळ यांच्यावर आर्थिक फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. रामदास झोळ हा अनेक दिवसांपासून फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहे. रामदास झोळ यांच्यासह ८ जणांवर कारवाई करण्यात आल्यामुळे सोलापूरमध्ये या प्रकरणाची जोरदार चर्चा होत आहे.

Maharashtra Politics: मोठी बातमी! भाजपच्या बड्या नेत्याविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई, राजकीय वर्तुळात खळबळ
BJP Maharashtra : भाजपचा मेगाप्लान! महाराष्ट्रात नव्या टीमची घोषणा, विरोधकांची धार बोथट करणार

भाजप नेता रामदास झोळ हा दत्तकला शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आहे. भोंदूबाबा मनोहर मामा प्रकरणाच्या तपासादरम्यान भाजप नेत्याचे नाव समोर आले होते. त्यानंतर रामदास झोळ याच्यासह ३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली होती पण रामदास झोळ फरार झाला. या प्रकरणाच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली होती की, भोंदूबाबा मनोहर भोसले याच्या अघोरी कृत्यातून मिळालेल्या पैशांची विल्हेवाट दत्तकला शिक्षण संस्थेचा अध्यक्ष म्हणजेच भाजप नेता रामदास झोळ लावायचा.

Maharashtra Politics: मोठी बातमी! भाजपच्या बड्या नेत्याविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई, राजकीय वर्तुळात खळबळ
BJP Leader : बाईकला आग, लाईव्ह लोकेशन अन्...: भाजप नेत्याच्या पत्नीने रचला पतीला संपवायचा थरारक कट

भोंदूबाब मनोहर मामा प्रकरणात रामदास झोळचे नाव समोर आल्यानंतर कुडुवाडी पोलिस ठाण्यात एप्रिल २०२६ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर रामदास झोळ फरार झाला. रामदास झोळशी संबंधित दत्तकला शिक्षण संस्थेतील कागदपत्रे, रजिस्टर, संगणक आणि इतर साहित्य पोलिसांनी तपासासाठी जप्त केले हेते याद्वारे पैशांच्या व्यवहारांची चौकशी सध्या सुरू आहे.

Maharashtra Politics: मोठी बातमी! भाजपच्या बड्या नेत्याविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई, राजकीय वर्तुळात खळबळ
BJP: भाजपला मोठा झटका! दिग्गज महिला नेत्याचा तडकाफडकी राजीनामा; राजकारणात खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com