BJP Leader : बाईकला आग, लाईव्ह लोकेशन अन्...: भाजप नेत्याच्या पत्नीने रचला पतीला संपवायचा थरारक कट

Andhra BJP leader Muniraju murder plot : आंध्र प्रदेशातील भाजप मंडल अध्यक्ष मुनिराजू यांच्या बाइकला आग लावल्याच्या तपासात कथित हत्या कटाचा उलगडा झाला. पोलिसांच्या माहितीनुसार पत्नी प्रशांतीने पतीच्या हालचाली आणि लोकेशनची माहिती आरोपींना दिल्याचा आरोप असून सहा जणांना अटक झाली आहे.
Andhra BJP leader Muniraju murder plot
Andhra BJP leader Muniraju murder plotSaam TV
Published On: 

BJP leader wife shared live location with lover : विजयवाडा येथील एका भाजप नेत्याच्या हत्येमागे खुद्द त्याच्याच पत्नीचा हात असल्याचे उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अनैतिक संबंध आणि मालमत्तेच्या वादातून पत्नीने प्रियकर आणि भाडोत्री गुंडांच्या मदतीने पतीच्या हत्येचा अत्यंत भयानक कट रचला. हत्येच्या वेळी पती कुठे आहे हे शोधण्यासाठी पत्नीने आरोपींना त्याचे 'लाईव्ह लोकेशन' (Live Location) शेअर केले होते. यानंतर आरोपींनी भाजप नेत्याची हत्या करून हा अपघात असल्याचा बनाव रचण्यासाठी त्यांची बाईक पेटवून दिली. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे पत्नीसह या कटात सामील असलेल्या सर्व आरोपींचा पर्दाफाश झाला आहे.

सुरुवातीला हे प्रकरण भाजप नेते मुनिराजू यांना लक्ष्य करून केलेली राजकीय तोडफोड किंवा धमकी असल्याचे वाटत होते. पण पोलिसांच्या तपासात पत्नीच या कटात सहभागी असल्याचे धक्कादायक पुरावे मिळाले. १३ सप्टेंबर रोजी या प्रकरणाची सुरुवात झाली. मुनिराजू यांना चंद्रगिरीमधील घराबाहेर त्यांची मोटारसायकल जळत असल्याचे दिसले. मुनिराजू यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. राजकीय वैमनस्यातून हा प्रकार घडला असावा असा संशय सुरुवातीला पोलिसांना आला. त्यानुसार तपास अधिकाऱ्यांनी राजकीय शत्रुत्वाच्या कोनातून लक्ष केंद्रित केले.

Andhra BJP leader Muniraju murder plot
CNG पंपावर गाडीत गॅस भरतानाच महाभयंकर स्फोट! क्षणात कारचे तुकडे-तुकडे झाले; पाहा थरारक व्हिडिओ

या जाळपोळीमागे राजकीय वैर होते का? याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी स्थानिक वादांची चाचपणी केली, पण तसे कोणतेही कारण आढळले नाही. त्यानंतर पोलिसांनी घटनेच्या वेळेच्या आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजच्या आधारे तपास अधिकारी स्थानिक तरुणांच्या एका गटापर्यंत पोहोचले. त्यानंतर साई, उदय किरण, लीला कृष्णा, पृथ्वीराज आणि हरीश या पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले. कडक चौकशीदरम्यान, मुनिराजूच्या मोटरसायकलवर ज्वलनशील पदार्थ ओतून ती पेटवून दिल्याची कबुली या संशयितांनी दिली.

Andhra BJP leader Muniraju murder plot
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लान, १०० विद्यमान आमदारांचे पत्ते कट होणार? राजकीय वर्तुळात खळबळ

दरम्यान, पोलिसांनी संशयितांचे मोबाईल फोन आणि सोशल मीडिया अकाऊंट्स तपासले, तेव्हा तपासाला वेगळेच वळण मिळाले. मुनिराजू यांची पत्नी प्रशांती ही आरोपी साईच्या सतत संपर्कात असल्याचे आढळले. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटची सखोल तपासणी केल्यावर प्रशांती आणि साई यांच्यात अनैतिक संबंध असल्याचे उघड झाले. पोलिसांच्या माहितीनुसार, मोटारसायकलला आग लावण्याची घटना ही प्रत्यक्षात मुनिराजू यांच्या हत्येच्या मोठ्या कटाचाच एक भाग होती.

Andhra BJP leader Muniraju murder plot
Boiler Explosion : कारखान्यात अचानक बॉयलर फुटला; ५ जणांचा जागीच मृत्यू, अनेक कामगार अडकल्याची भीती?

प्रशांतीने साई आणि इतर आरोपींसोबत मिळून पतीच्या हत्येचा कट रचला होता. तिने सोशल मीडियाचा वापर करून मुनिराजू यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले, त्यांच्या दैनंदिन दिनचर्येचा तपशील शेअर केला आणि ते कुठे आहेत याचे 'लाइव्ह अपडेट्स' इतर आरोपींना पुरवले, असा आरोप पोलिसांनी केला आहे. या धक्कादायक माहितीनंतर चंद्रगिरी पोलिसांनी तपासाचा विस्तार करत प्रशांतीसह इतर सर्व आरोपींना अटक केली. या सहाही आरोपींवर विविध कलमांखाली गुन्हे दाखल करून त्यांना दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले असून, न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com