CNG पंपावर गाडीत गॅस भरतानाच महाभयंकर स्फोट! क्षणात कारचे तुकडे-तुकडे झाले; पाहा थरारक व्हिडिओ

CNG Car Explosion : गुजरातमधील करजणजवळ NH-48 वरील CNG पंपावर गॅस भरताना कारमध्ये अचानक स्फोट झाला. सुदैवाने प्रवासी बाहेर असल्याने जीवितहानी टळली. CNG भरताना कोणती काळजी घ्यावी आणि Hydro Testing का महत्त्वाची आहे, जाणून घ्या.
CNG Car Explosion
CNG Car ExplosionSaam TV
Published On: 

CNG car explodes while refuelling at Gujarat pump : एका सीएनजी (CNG) पंपावर भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. सीएनजी पंपावर गाडीत गॅस भरण्याचे काम सुरू असतानाच अचानक महाभयंकर स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी भयानक होती की एकाच क्षणात संपूर्ण कारचे तुकडे-तुकडे झाले आणि आसपासचा परिसर हादरून गेला. हा काळजाचा ठोका चुकवणारा थरार थेट कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सुदैवाने गॅस भरताना चालक आणि प्रवासी कारच्या बाहेर उभे असल्याने मोठा अनर्थ टळला. परंतु, या घटनेने सीएनजी वाहनधारकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आणला आहे.

गुजरात मधील करजणजवळ राष्ट्रीय महामार्ग-४८ (NH-48) वर असलेल्या सीएनजी पंपावर कारमध्ये भीषण स्फोट होण्याची ही दुर्घटना घडली. गॅस भरताना आपण नकळत केलेल्या काही लहान-सहान चुका थेट प्राणावर बेतू शकतात. त्यामुळे अशा अपघातांपासून वाचण्यासाठी आणि स्वतःचा व कुटुंबाचा जीव सुरक्षित ठेवण्यासाठी नक्की काय काळजी घेतली पाहिजे, ते सविस्तर जाणून घेऊया...

CNG Car Explosion
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लान, १०० विद्यमान आमदारांचे पत्ते कट होणार? राजकीय वर्तुळात खळबळ

नॅशनल हायवेवरील या पंपावर कार चालक गाडीत सीएनजी भरण्यासाठी आला होता. गॅस भरण्याची प्रक्रिया सुरू असतानाच अचानक सिलेंडरमध्ये मोठा स्फोट झाला. स्फोटामुळे गाडीचे सर्व भाग हवेत उडाले आणि कारचा अक्षरशः सांगडा उरला.स्फोटामुळे गाडीच्या मागच्या भागाचे तुकडे आणि फुटलेल्या काचा गाडीपासून काही मीटर दूर उडाल्या. उपलब्ध माहितीनुसार, जवळच पार्क केलेल्या इतर दोन वाहनांचेही स्फोटात नुकसान झाले.

CNG Car Explosion
Boiler Explosion : कारखान्यात अचानक बॉयलर फुटला; ५ जणांचा जागीच मृत्यू, अनेक कामगार अडकल्याची भीती?

सुदैवाने गॅस भरत असताना नियमानुसार कारमधील प्रवासी बाहेर उभे असल्यामुळे मोठा अनर्थ टळला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. या संपूर्ण घटनेचा थरारक व्हिडिओ सीटीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात किंवा प्रत्यक्षदर्शींच्या मोबाईलमध्ये कैद झाला असून, तो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

CNG Car Explosion
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेसाठी नवे अर्ज आणि पुन्हाe-KYC सुरू? सरकारचा अत्यंत महत्त्वाचा खुलासा

सीएनजी वाहनधारकांसाठी महत्त्वाचा इशारा:

या घटनेनंतर सीएनजी गाड्यांमध्ये गॅस भरताना घ्यावयाच्या खबरदारीचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला आहे. गॅस भरताना गाडीचे इंजिन बंद ठेवणे, वाहनातून सर्व प्रवाशांनी बाहेर पडणे आणि सीएनजी किट व सिलेंडरची वेळोवेळी तपासणी (Hydro Testing) करणे अत्यंत गरजेचे असल्याचे आहे. सीएनजी पंपावर गॅस भरताना गाडी सुरू ठेवू नका अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com