BJP Maharashtra : भाजपचा मेगाप्लान! महाराष्ट्रात नव्या टीमची घोषणा, विरोधकांची धार बोथट करणार

Ravindra Chavan latest news : भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र भाजपची महत्त्वाची बैठक पार पडली. विरोधकांच्या नरेटिव्हला प्रत्युत्तर देण्यासाठी आशिष शेलार, नितेश राणे, प्रवीण दरेकर, संजय कुटे यांच्यासह महिला आणि युवा नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली.
BJP Maharashtra
BJP Maharashtra
Published On: 

BJP Maharashtra : विरोधकांकडून पसरवल्या जाणाऱ्या विविध राजकीय मुद्द्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी महाराष्ट्र भाजपने आपली रणनीती आखली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत याबाबत आज एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत विरोधी पक्षांच्या आरोपांना आक्रमकपणे उत्तर देण्यासाठी आणि पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी भाजपच्या प्रमुख नेत्यांची एक विशेष फौज मैदानात उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विरोधकांचे प्रत्येक आरोप खोडून काढण्यासाठी भाजपने विविध विभागांनुसार आणि अनुभवी नेत्यांकडे जबाबदारी सोपवली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष व मंत्री आशिष शेलार, मंत्री नितेश राणे, आमदार प्रवीण दरेकर आणि आमदार संजय कुटे हे विरोधकांवर थेट हल्लाबोल करतील अन् आरोपांचे प्रत्युत्तर देतील.

BJP Maharashtra
Bank Scam : महिला सहकारी बँकेत २४२ कोटींचा घोटाळा! संचालकांसह अनेकांवर गुन्हे, ईडीच्या छापेमारीने महाराष्ट्रात खळबळ

पक्षाची भूमिका भक्कमपणे मांडण्यासाठी भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा आमदार चित्रा वाघ आणि आमदार देवयानी फरांदे यांच्याकडे मुख्य जबाबदारी देण्यात आली आहे. युवा चेहरा म्हणून आमदार विक्रम पाचपुते, आमदार निरंजन डावखरे आणि मुख्य प्रवक्ते नवनाथ बन विरोधकांच्या आरोपांचा अभ्यासपूर्ण समाचार घेतील.

BJP Maharashtra
Fact Check : सर्व सरकारी बँका शनिवारी राहणार बंद; काय आहे व्हायरल सत्य? जाणून घ्या

आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून होणारे चुकीचे दाव्यांचे खंडन करणे, तसेच शासनाच्या व पक्षाच्या कल्याणकारी योजना थेट जनतेपर्यंत पोहोचवणे हा या रणनीतीचा मुख्य उद्देश आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही सर्व टीम आता पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com