Bank Scam : महिला सहकारी बँकेत २४२ कोटींचा घोटाळा! संचालकांसह अनेकांवर गुन्हे, ईडीच्या छापेमारीने महाराष्ट्रात खळबळ

ED Raids Yavatmal : यवतमाळच्या बाबाजी दाते महिला सहकारी बँकेतील २४२ कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहार प्रकरणात ED ने यवतमाळ आणि वणी परिसरातील सुमारे सात ठिकाणी छापेमारी केली. प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडूनही सुरू आहे.
Babaji Date Women’s Cooperative Bank Scam
Babaji Date Women’s Cooperative Bank Scam
Published On: 

संजय राठोड, यवतमाळ प्रतिनिधी

Babaji Date Women’s Cooperative Bank Scam : यवतमाळच्या प्रसिद्ध 'बाबाजी दाते महिला सहकारी बँके'तील तब्बल २४२ कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी आज ED ने मोठी कारवाई केली. ईडीच्या पथकांनी गुरुवारी सकाळपासूनच यवतमाळ आणि वणी परिसरातील सुमारे सात ठिकाणी एकाच वेळी छापेमारी केली. या कारवाईमुळे जिल्ह्यातील बड्या कर्जदारांसह राजकीय आणि व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.

बँकेतील २४२ कोटींच्या घोटाळा प्रकरणात यापूर्वीच बँकेचे तत्कालीन संचालक, अधिकारी, मूल्यांकन करणारे (व्हॅल्युवर) आणि तब्बल २०० हून अधिक थकीत कर्जदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या संपूर्ण घोटाळ्याचा तपास सध्या आर्थिक गुन्हे शाखेकडून (EOW) सुरू आहे. मात्र, पैशांची मोठी अफरातफर झाल्याचा संशय असल्याने आता थेट ईडीने या प्रकरणात हस्तक्षेप करत धाडी सत्र सुरू केले आहे.

Babaji Date Women’s Cooperative Bank Scam
Fact Check : सर्व सरकारी बँका शनिवारी राहणार बंद; काय आहे व्हायरल सत्य? जाणून घ्या

पहाटे ६ वाजता धडकले अधिकारी; ७ तास झाडाझडती

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास ईडीचे अधिकारी दोन इनोव्हा गाड्यांमधून यवतमाळ आणि वणी शहरात दाखल झाले. यवतमाळमधील रजनी अशोक कंचलवार आणि वणी येथील निळकंठ मालती अपार्टमेंटमध्ये राहणारे मेडिकल व्यावसायिक रवी येरणे यांच्या निवासस्थानी ईडीच्या पथकांनी विशेष तपासणी केली. वणी येथील रवी येरणे यांच्या फ्लॅटवर सकाळी ६ वाजेपासून सुमारे सात तासांहून अधिक काळ झाडाझडती सुरू होती. या अचानक झालेल्या कारवाईमुळे थकीत कर्जदार आणि बँक प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.

Babaji Date Women’s Cooperative Bank Scam
मोठा राजकीय भूकंप! जिगरी मित्रपक्षच देणार भाजपला धक्का; सत्ताधारी पक्षासोबत आघाडीत सहभागी होणार

कारवाईचे नेमके कारण काय?

बँकेतून बेकायदेशीरपणे कर्जवाटप करणे, बोगस मालमत्तांवर कर्ज देणे आणि थकीत कर्जाची वसुली न करता कोट्यवधींचा अपहार करणे, असा आरोप बँकेच्या तत्कालीन व्यवस्थापनावर आहे. याच थकीत कर्जाच्या आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या धाग्यादोरऱ्यांचा शोध घेण्यासाठी ईडीने ही छापेमारी केल्याचे समजते.

दरम्यान, अधिकाऱ्यांनी या कारवाईदरम्यान कोणती महत्त्वाची कागदपत्रे किंवा डिजिटल पुरावे जप्त केले आहेत का, याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. तपास यंत्रणेकडून अधिकृत निवेदन जारी झाल्यानंतरच या कारवाईचा सविस्तर तपशील समोर येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com