दोन राज्यात बॅलेट पेपरवर निवडणुका; काँग्रेसचा दारुण पराभव! 100 पैकी भाजप+NDA ने किती जागा जिंकल्या?

Ballot Paper Elections: बॅलेट पेपरवर झालेल्या त्रिपुरा आणि आसाममधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप-एनडीएला मोठं यश मिळालं.
BALLOT PAPER ELECTION RESULTS
BALLOT PAPER ELECTION RESULTSsaam tv
Published On: 

काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांकडून सातत्याने EVM च्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करत बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली जात आहे. मात्र, नुकत्याच बॅलेट पेपरवर झालेल्या त्रिपुरा आणि आसाममधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निकालात कॉँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले. त्रिपुरातील विलेज कमिटी निवडणुकीत NDA मधील टिपरा मोथा पार्टीने मोठी आघाडी घेतली आहे. त्रिपुरा निवडणूक आयोगाने दिलेल्या महितीनुसार, 587 विलेज कमिटींसाठी झालेल्या निवडणुकीत 2,634 मतदारसंघ आणि 4,597 जागांचा समावेश होता. या निवडणुकीत मतदान बलेत पेपरवर घेण्यात आले.

BALLOT PAPER ELECTION RESULTS
IAS Officer Transfer: प्रशासनात मोठा बदल! १० वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

1,644 जागा बिनविरोध

नामांकन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 167 संपूर्ण विलेज कमिट्या बिनविरोध घोषित करण्यात आल्या. यामध्ये 1,644 जागांचा समावेश होता. तर तीन जागा रिक्त राहिल्या. त्यानंतर 4,594 जागांसाठी मतदान झालं. या निवडणुकीत टिपरा मोथा पार्टीने 3,428 जागांवर विजय मिळवला. एकूण जागांच्या तुलनेत हा वाटा सुमारे 74.62 टक्के आहे. भाजपने 859 जागा जिंकत दुसरे स्थान मिळवले. टिपरा मोथा आणि भाजपने मिळून तब्बल 94 टक्के जागा जिंकल्या. तर 173 उमेदवार हे अपक्ष निवडून आले. तर CPI(M) ला 87, IPFला 33 आणि कॉँग्रेसला 14 जागा मिळाल्या. या आकडेवारीमध्ये बिनविरोध निवडून आलेल्या जागांचाही समावेश आहे.

BALLOT PAPER ELECTION RESULTS
आता थेट राज्याचं नाव बदलणार, भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी दिले संकेत; नवीन नाव देखील सूचवलं

आसाममध्येही NDAला मोठं यश

आसाममधील सिलचर नगर पालिकेच्या पहिल्याच निवडणुकीतही भाजपच्या नेतृत्वाखालील NDAने 42 पैकी 34 जागा जिंकल्या. यामध्ये भाजपला 32 तर मित्रपक्ष असम गण परिषदेला (AGP) दोन जागा मिळाल्या. काँग्रेसला केवळ दोन जागांवर विजय मिळाला, तर सहा जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले. या निकालानंतर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेसवर टीका केली. बॅलेट पेपरवर झालेल्या निवडणुकीतही काँग्रेसला अपेक्षित कामगिरी करता आली नाही असे म्हणत त्यांनी विरोधकांवर तोफ डागली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com