IAS Officer Transfer: प्रशासनात मोठा बदल! १० वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

IAS Officer Transfer In Uttar Pradesh: उत्तर प्रदेशमध्ये १० आयएएस अधिकाऱ्यांच्या रविवारी रात्री तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. यामुळे प्रशासनात खळबळ उडाली.
IAS Officer Transfer: प्रशासनात मोठा बदल! १० वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?
IAS Officer TransferSaam Tv
Published On
  • उत्तर प्रदेश सरकारकडून मोठा प्रशासकीय फेरबदल

  • उत्तर प्रदेशात १० वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

  • यूपी आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीची यादी जाहीर

  • उच्च शिक्षण, आरोग्य कृषी ऊर्जा विभागातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

उत्तर प्रदेश सरकारकडून प्रशासकीय बदलीचे सत्र सुरूच आहेत. सरकारने रविवारी रात्री १० वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या विभागांमध्ये मोठा फेरबदल केला. १० आयएएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदली करण्यात आल्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. या फेरबदलात अनेक अधिकाऱ्यांकडील महत्त्वाची खाती काढून ती इतर अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहेत. तर काही अधिकाऱ्यांना त्यांच्या विद्यमान पदासोबत अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. उच्च शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, कृषी, पंचायतराज, अन्न व औषध प्रशासन, ऊर्जा आणि कामगार विभागात हे बदल करण्यात आले आहेत. या १० आयएएस अधिकाऱ्यांची कुठे बदली करण्यात आणि त्यांची नियुक्ती कुठे करण्यात आली हे आपण जाणून घेणार आहोत...

कोणत्या अधिकाऱ्यांकडे कोणती जबाबदारी?

अमित कुमार घोष यांची अपर मुख्य सचिव, उच्च शिक्षण विभाग म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांच्याकडे वैद्यकीय आरोग्य व कुटुंब कल्याण तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाचा प्रभार होता. अमृत अभिजात यांच्याकडे विद्यमान पदासोबत परिवहन विभागाच्या अपर मुख्य सचिवपदाचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला आहे. व्ही. हेकाली झिमोमी यांची वन, पर्यावरण व हवामान बदल विभागाच्या प्रमुख सचिवपदावरून बदली करून त्यांच्याकडे वैद्यकीय आरोग्य व कुटुंब कल्याण तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

IAS Officer Transfer: प्रशासनात मोठा बदल! १० वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?
IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! बड्या ५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुठे कोणाची नियुक्ती? वाचा

महेंद्र प्रसाद अग्रवाल यांना उच्च शिक्षण विभागाच्या प्रमुख सचिवपदावरून हटवून वन, पर्यावरण व हवामान बदल विभागाचे प्रमुख सचिव करण्यात आले आहे. अनिल कुमार यांना पंचायतराज विभागाच्या प्रमुख सचिवपदावरून हटवून प्रमुख सचिव, अन्न व रसद तसेच अन्न व रसद विभागाचे ग्राहक व्यवहार आयुक्त अशी जबाबदारी देण्यात आली आहे. पंचायतराज विभागातील डिजिटल लायब्ररीच्या योजनेवरून त्यांचा पंचायतराज मंत्री ओमप्रकाश राजभर यांच्याशी मतभेद झाल्याचा दावा करण्यात आला होता. डॉ. एम.के.एस. सुंदरम यांच्याकडे कृषी विभागाशी संबंधित महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. त्यांना प्रमुख सचिव कृषी, कृषी शिक्षण व संशोधन तसेच कृषी विपणन, कृषी परदेशी व्यापार आणि निर्यात प्रोत्साहन विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.

IAS Officer Transfer: प्रशासनात मोठा बदल! १० वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?
राज्य महिला आयोगावर डॅशिंग अधिकाऱ्याची नियुक्ती; 3 IAS अधिकाऱ्यांच्याही बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती?

कृषी विभागातील ही जबाबदारी सांभाळणारे रवींद्र यांची प्रमुख सचिव, पंचायतराज विभाग म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अमित गुप्ता यांच्याकडे विद्यमान पदासोबत प्रमुख सचिव, व्यावसायिक शिक्षण विभागाचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला आहे. ऊर्जा विभागातही मोठा बदल रणवीर प्रसाद यांना प्रमुख सचिव ऊर्जा व अतिरिक्त ऊर्जा विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. यासोबतच उत्तर प्रदेश पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड, उत्तर प्रदेश पॉवर ट्रान्समिशन कॉर्पोरेशन लिमिटेड, उत्तर प्रदेश राज्य विद्युत उत्पादन निगम लिमिटेड आणि यूपीएसएलडीसी लिमिटेडच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

IAS Officer Transfer: प्रशासनात मोठा बदल! १० वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?
IAS Officer Transfer: बदल्यांचा धडाका सुरूच! 14 आयएएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

डॉ. आशीष कुमार गोयल यांच्याकडील ऊर्जा व अतिरिक्त ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिवपदाची तसेच पॉवर कॉर्पोरेशनच्या अध्यक्षपदाची जबाबदारी बदलण्यात आली आहे. त्यांची अपर मुख्य सचिव, श्रम व सेवायोजन विभाग म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या फेरबदलामुळे उत्तर प्रदेशातील उच्च शिक्षण, आरोग्य, कृषी, पंचायतराज आणि ऊर्जा यांसारख्या महत्त्वाच्या विभागांच्या प्रशासकीय जबाबदाऱ्यांमध्ये मोठे बदल झाले आहेत.

IAS Officer Transfer: प्रशासनात मोठा बदल! १० वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?
मध्यरात्री मोठा प्रशासकीय भूकंप; १४ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कोणत्या शहरात नियुक्ती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com