IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! बड्या ५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुठे कोणाची नियुक्ती? वाचा

Uttar pradesh Lucknow IAS Transfer News : उत्तर प्रदेश सरकारने मोठा प्रशासकीय फेरबदल करत ५ IAS आणि ६ PCS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. जालौन, बहराइच, झांसी, बाराबंकी, कानपूर आणि गोंड्यात महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.
Uttar Pradesh IAS Transfer News
Uttar Pradesh IAS Transfer NewsAI Image
Published On
Summary
  • उत्तर प्रदेश सरकारने मोठा प्रशासकीय फेरबदल केला

  • 11 IAS-PCS अधिकाऱ्यांच्या बदल्या

  • 5 IAS आणि 6 PCS अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये दोन जिल्हाधिकाऱ्यांचाही समावेश

उत्तर प्रदेश सरकारने गुरुवारी रात्री प्रशासकीय पातळीवर मोठा फेरबदल करत पाच आयएएस आणि सहा पीसीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये दोन जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश असून, विविध महत्त्वाच्या पदांवर नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जालौनच्या जिल्हाधिकाऱ्यांची बहराइचला बदली

जालौनचे जिल्हाधिकारी राजेश कुमार पांडेय यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्यावर आता बहराइचच्या जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर विशेष सचिव, आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स विभागात कार्यरत समीर यांची जालौनच्या नव्या जिल्हाधिकाऱ्यापदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Uttar Pradesh IAS Transfer News
Throat Cancer : गरमा गरम चहा प्यायल्याने घशाचा कॅन्सर होऊ शकतो का? जाणून घ्या

झांसी आणि बाराबंकीलाही नवे अधिकारी

झांसीच्या नगर आयुक्त आकांक्षा राना यांना विशेष सचिव, आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. बाराबंकीचे मुख्य विकास अधिकारी बी. सूदन यांची झांसीच्या नगर आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. तर मुरादाबाद विकास प्राधिकरणाचे सचिव पंकज वर्मा यांना बाराबंकीचे मुख्य विकास अधिकारी करण्यात आले आहे.

Uttar Pradesh IAS Transfer News
Ayurveda Benefits : सर्दी-खोकला झटक्यात नाहीसा, डिप्रेशनवरही मात;जाणून घ्या 'या' आयुर्वेदिक वनस्पतींचे फायदे

PCS अधिकाऱ्यांची बदली

पीसीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्येही महत्त्वाच्या पदांवर फेरबदल करण्यात आला आहे. सुशील प्रताप सिंह यांना लखनऊ विकास प्राधिकरणाचे सचिव करण्यात आले आहे. यापूर्वी ते भातखंडे संस्कृती विद्यापीठाचे कुलसचिव आणि संस्कृति निदेशालयाचे अपर निदेशक म्हणून कार्यरत होते. एलडीएचे संयुक्त सचिव अतुल कुमार यांच्याकडे आता भातखंडे संस्कृती विद्यापीठाचे कुलसचिव आणि संस्कृति निदेशालयाच्या अपर निदेशकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Uttar Pradesh IAS Transfer News
Gavar Side Effects : गवार खाणं 'या' लोकांसाठी ठरू शकत धोकादायक! 'ही' ६ कारणे वेळीच घ्या जाणून

कानपूर, गोंडा आणि झांसीमध्येही फेरबदल

बदायूंमध्ये उपजिल्हाधिकारी असलेले राजेश कुमार सिंह यांची कानपूर नगरच्या अपर जिल्हाधिकारी (नागरिक पुरवठा) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. गोंडाचे अपर जिल्हाधिकारी संजय कुमार सिंह यांना युवा कल्याण विभागात उपनिदेशक (प्रशासन) करण्यात आले आहे. झांसीचे नगर मजिस्ट्रेट प्रमोद झा यांची गोंडाच्या अपर जिल्हाधिकारी (वित्त व महसूल) पदावर बदली झाली आहे. तर कुशीनगरचे उपजिल्हाधिकारी योगेश्वर सिंह आता झांसीचे नगर मजिस्ट्रेट म्हणून काम पाहतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com