Alisha Khedekar
गवार पौष्टिक भाजी असली तरी काही व्यक्तींनी ती खाताना काळजी घ्यावी किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
गवारीमध्ये भरपूर फायबर असल्याने संवेदनशील पचनशक्ती असणाऱ्यांना गॅस, पोटफुगी किंवा अस्वस्थता जाणवू शकते.
आधीपासूनच गॅस किंवा पोटफुगीचा त्रास असणाऱ्यांनी गवार जास्त प्रमाणात खाणे टाळावे.
किडनीचा आजार असणाऱ्यांनी आहारातील पोटॅशियमचे प्रमाण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ठेवणे महत्त्वाचे आहे.
आहारात फायबर कमी असल्यास अचानक भरपूर गवार खाल्ल्याने पोटात गोळा, गॅस किंवा शौचाच्या तक्रारी होऊ शकतात.
गवार कच्ची खाण्याऐवजी व्यवस्थित शिजवून खावी. यामुळे पचनास त्रास होण्याची शक्यता कमी होते.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा