मध्यरात्री मोठा प्रशासकीय भूकंप; १४ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कोणत्या शहरात नियुक्ती?

१४ IAS Officers Transferred: उत्तर प्रदेश सरकारने विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर १४ IAS आणि ३४ PCS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. सुमित राजेश महाजन, सुनील कुमार वर्मा यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांना नव्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.
UP GOVERNMENT TRANSFERS 14 IAS AND 34 PCS OFFICERS
UP GOVERNMENT TRANSFERS 14 IAS AND 34 PCS OFFICERSsaam tv
Published On

उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने प्रशासनात मोठा फेरबदल केला आहे. राज्य सरकारने रात्री उशिरा १४ IAS आणि ३४ PCS अधिकाऱ्यांच्या बदल्या करत त्यांच्यावर नव्या जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. सहारनपूरचे मुख्य विकास अधिकारी सुमित राजेश महाजन यांची उत्तर प्रदेश स्टार्टअप मिशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यकर विभागाचे अपर आयुक्त डॉ. सुनील कुमार वर्मा यांची सहारनपूरच्या नव्या CDO पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

UP GOVERNMENT TRANSFERS 14 IAS AND 34 PCS OFFICERS
IAS Officer Transfer: बदल्यांचा धडाका सुरूच! 14 आयएएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

IT आणि इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे विशेष सचिव राहुल सिंह यांची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विशेष सचिवपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी लखीमपूर खेरीचे CDO अभिषेक कुमार यांची IT आणि इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या विशेष सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

UP GOVERNMENT TRANSFERS 14 IAS AND 34 PCS OFFICERS
अचानक 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

काही अधिकाऱ्यांना बढती, तर काहींवर नव्या जबाबदाऱ्या

आयोध्येचे ADM योगानंद पांडे यांची बढती करण्यात आली असून त्यांची लखीमपूर खेरीच्या CDO पदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रयागराज येथील राजस्व परिषद सदस्य साहब सिंह यांची सचिवालय प्रशासन विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विध्यांचल मंडळाचे अपर आयुक्त डॉ.विश्राम आणि रेशीम विभागाचे विशेष सचिव आणि संचालक देवेंद्र कुमार सिंह कुशवाह यांना राजस्व परिषदेत सदस्य म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

UP GOVERNMENT TRANSFERS 14 IAS AND 34 PCS OFFICERS
11 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; दोन डॅशिंग महिला अधिकाऱ्यांना दिली मोठी जबाबदारी

उत्तर प्रदेश सरकारच्या या प्रशासकीय फेरबदलामुळे आगामी विधानसभा निवडणुकांच्या आधी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये मोठे बदल झाले आहेत. आंबेडकरनगरचे CDO आनंद कुमार शुक्ला यांची रेशीम विभागाच्या विशेष सचिव आणि संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर कुशीनगरचे ADM (वित्त/राजस्व) वैभव मिश्रा यांना आंबेडकरनगरच्या CDOपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. युवा कल्याण विभागाचे संयुक्त संचालक अशोक कुमार कनौजिया यांची माध्यमिक शिक्षण विभागाच्या विशेष सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर अलीगढ मंडळाचे अपर आयुक्त अरुण कुमार यांना ग्राम विकास विभागाचे विशेष सचिव करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com