राज्य महिला आयोगावर डॅशिंग अधिकाऱ्याची नियुक्ती; 3 IAS अधिकाऱ्यांच्याही बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती?

Transfers Three IAS Officers Latest Update: पंजाब सरकारने तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नव्या नियुक्त्यांचे आदेश जारी केले आहेत. ऋषि पाल सिंह यांची पंजाब राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
3 IAS OFFICERS TRANSFERRED
3 IAS OFFICERS TRANSFERREDsaam tv
Published On

पंजाब सरकारने प्रशासकीय पातळीवर तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नव्या नियुक्तांचे आदेश जारी केले आहेत. सरकारकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, 2014 बॅचचे IAS अधिकारी ऋषि पाल सिंह यांची पंजाब राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच आणखी दोन IAS अधिकाऱ्यांना नव्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.

3 IAS OFFICERS TRANSFERRED
11 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; दोन डॅशिंग महिला अधिकाऱ्यांना दिली मोठी जबाबदारी

ऋषि पाल सिंह यांच्याकडे महिला आयोगाची जबाबदारी

2014 बॅचचे IAS अधिकारी ऋषि पाल सिंह आता पंजाब राज्य महिला आयोगाचे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. आयोगाशी संबंधित प्रशासकीय कामकाज तसेच विविध विभागांमध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असणार आहे.

3 IAS OFFICERS TRANSFERRED
अचानक 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

IAS सुखजीत पाल सिंह यांची रजिस्टारपदी नियुक्ती

2018 बॅचचे IAS अधिकारी सुखजीत पाल सिंह यांची बदली करून त्यांची पंजाब कृषि विद्यापीठ लुधीयाना येथे रजिस्टारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या प्रशासकीय कामकाजाची जबाबदारी ते सांभाळणार आहेत.

3 IAS OFFICERS TRANSFERRED
IAS Officer Transfer: मोठी बातमी! राज्यातील ११ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

अभिजीत कपालिश यांच्याकडे ऊर्जा विकासाची जबाबदारी

दरम्यान, 2015 बॅचचे IAS अधिकारी अभिजीत कपलिश यांची पंजाब ऊर्जा विकास विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडे क्रीडा आणि युवा सेवा विभागाच्या संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभारही सोपवण्यात आला आहे. या प्रशासकीय आदेशानंतर तिन्ही अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल झाला आहे. अभिजीत कपलिश यांच्याकडे पंजाब ऊर्जा विकास एजन्सीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदासोबतच क्रीडा आणि युवा सेवा विभागाच्या संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभारही राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com