Maharashtra Politics: मी भोळा असतो, तर भाजपवाल्यांनी मला खाऊन टाकलं असतं, शिंदेंच्या नेत्याचं खळबळजनक विधान

Gulabrao Patil On BJP: मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावमध्ये भाषण करताना मित्रपक्ष भाजपबाबत खळबळजनक विधान केले. मी भोळा असतो, तर भाजपवाल्यांनी मला खाऊन टाकलं असतं, असं ते म्हणाले.
Maharashtra Politics: मी भोळा असतो, तर भाजपवाल्यांनी मला खाऊन टाकलं असतं, शिंदेंच्या नेत्याचं खळबळजनक विधान
Gulabrao PatilSaam Tv
Published On
  • गुलाबराव पाटील यांचे भाजपबाबत खळबळजनक विधान

  • मी भोळा असतो तर भाजपवाल्यांनी मला खाऊन टाकलं असतं असं ते म्हणाले

  • गुलाबराव पाटील यांच्या विधानाची जोरदार चर्चा

  • जळगावमधील एका कार्यक्रमात बोलताना गुलाबराव पाटील यांनी भाजपवर साधला निशाणा

संजय महाजन, जळगाव

महायुतीमध्ये सर्वकाही व्यवस्थित सुरू आहे, कुणी नाराज नाही असा दावा वरिष्ठ नेत्यांकडून वारंवार केला जात आहे. पण महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. शिंदेसेनेच्या बड्या नेत्याने भाजपबाबत खळबळजनक विधान केलेत्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 'मी भोळा राहिलो असतो, तर भाजपवाल्यांनी मला खाऊन टाकलं असतं.', असं खळबळजनक विधान केले. गुलाबराव पाटील यांच्या मनात असलेले खदखद त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवली त्यामुळे जिल्ह्यात जोरदार चर्चा होत आहे.

जळगावमध्ये दूध विकास संघाचे संस्थापक चेअरमन स्वर्गीय जे. टी. महाजन यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात गुलबराव पाटील यांनी हे खळबळजनक विधान केले. गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, 'त्या काळातील सहकार क्षेत्रात सर्वच माणसे ही साधी-भोळी होती. रमेशभाऊ ३ वेळा आमदार राहिले आणि सहकार क्षेत्रातही ते चेअरमन झाले. त्यावेळी सगळेच जण भोळे होते. पण मी भोळा नाही. मी जर भोळा राहिलो असतो तर भाजपवाल्यांनी मला खाऊन टाकलं असतं.'

Maharashtra Politics: मी भोळा असतो, तर भाजपवाल्यांनी मला खाऊन टाकलं असतं, शिंदेंच्या नेत्याचं खळबळजनक विधान
Maharashtra Politics : फडणवीस-शिंदे असते तर गुंगा गुड्डा म्हटले असते, राऊतांच्या वक्तव्याने वाद उफळणार?

गुलाबराव पाटील यांनी जे. टी. महाजन यांच्या साधेपणाच्या आठवणींबद्दल सांगताना त्यांनी सहकार क्षेत्रातील त्यांच्य योगदानाचे कौतुक केले. ते म्हणाले, 'आम्ही लहान असताना जे. टी. महाजन यांना पाहायचो. त्यांचे राहणीमान अत्यंत साधे होते. त्यांना पाहिल्यावर एखादा शेतकरीच आपल्यासमोर आला आहे असे वाटायचे. आज एका शेतकऱ्याच्या पुतळ्याचे अनावरण एका शेतकरी पुत्राच्या हस्ते होत आहे याबद्दल मला अभिमान आहे.'

Maharashtra Politics: मी भोळा असतो, तर भाजपवाल्यांनी मला खाऊन टाकलं असतं, शिंदेंच्या नेत्याचं खळबळजनक विधान
Maharashtra Politics: उल्हासनगरमध्ये शिंदेसेनेला दुसरा मोठा धक्का, आणखी एका नगरसेविकेचे पद गेलं

गुलाबराव पाटील यांनी पुढे सांगितले की, 'मी सुरुवातीला सहकार क्षेत्रात काम करणारा नव्हतो. पण पवार आणि चिमणराव यांच्यामुळे या क्षेत्रात उभा राहिलो. सहकार क्षेत्रात काम करत असताना प्रत्येक गोष्टीचा विचार करून सही करावी लागते. मी स्वतःसाठी काही घेत नाही. शेतकऱ्यांनी आपल्यावर विश्वास ठेवला आहे. त्यांचा हा विश्वास जपला पाहिजे. सत्तेत राहण्याची संधी मला मिळाली आहे. त्यामुळे सत्तेची निष्ठा राखून संस्था नीट चालवल्या पाहिजेत.'

Maharashtra Politics: मी भोळा असतो, तर भाजपवाल्यांनी मला खाऊन टाकलं असतं, शिंदेंच्या नेत्याचं खळबळजनक विधान
Maharashtra politics : ठाकरेंनंतर पवारांना धक्का? ६ खासदार अस्वस्थ, माजी मुख्यमंत्र्यांच्या दाव्याने खळबळ; नेमकं काय म्हणाले?

'फक्त कार्यक्रम करून काहीच उपयोग नाही. जनतेने आणि शेतकऱ्यांनी दिलेल्या संस्था आणि जबाबदाऱ्या व्यवस्थित सांभाळल्या पाहिजेत. आपल्या भागातील अनेक कारखाने बंद आहेत. पण खासगी कारखाने जोरदारपणे सुरू आहेत. जनतेने दिलेल्या संस्था नीट सांभाळल्या, तर सरकारही मजबूत राहील. एक तुकाराम मुंडे आले आणि इकडे दुधाची आवक वाढली. आता पनीरही सापडत नाही एवढी मागणी निर्माण झाली आहे. हा केवळ कार्यक्रम नसून कौटुंबिक सोहळा आहे. दूध विकास संघाने भविष्यातही शेतकऱ्यांचा विश्वास कायम राखून काम करावे., अशी आशा गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली.

Maharashtra Politics: मी भोळा असतो, तर भाजपवाल्यांनी मला खाऊन टाकलं असतं, शिंदेंच्या नेत्याचं खळबळजनक विधान
Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंविरोधात हॉटेलमध्ये संजय राऊतांच्या बैठका; खासदाराच्या दाव्यानं राजकारणात खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com