ठाकरेसेना आणि शिंदेसेनेच्या खासदारांमध्ये चांगलीच जुंपली आहे. उद्धव ठाकरेंना विरोध करणारे संजय राऊतच होते, असा गंभीर आरोप खासदार नरेश म्हस्के यांनी केला. तर एकनाथ शिंदेंविरोधात बोलणारे नरेश म्हस्केच होते, असा पलटवार राऊतांनी केला आहे.
उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केलं आणि स्वतःच्या भावाला मंत्रिपद दिलं नाही. उद्धव ठाकरे मंत्रालयात जात नाहीत म्हणून त्यावेळी शिवसेनेतील आमदारांना पवईतील हॉटेलमध्ये बैठक घ्यायला लावली. उद्धव ठाकरेंना विरोध करा आणि माझे नाव मुख्यमंत्रिपदासाठी घ्या, असं कुभांड रचलं जात होते. आम्ही तुमचा आदर करतो. त्यामुळे आमची झाकली मूठ बंद राहू द्या, असा इशारा म्हस्केंनी राऊत यांना दिला.
तर, म्हस्केंच्या आरोपावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कधीकाळी ते आमच्यासोबत काम करत होते. एकनाथ शिंदेंच्या सर्वाधिक तक्रारी करण्यात ते आघाडीवर होते. ठाण्यातून त्या काळात शिंदेंच्या कुणी तक्रारी केल्या असतील तर ते म्हस्के होते. म्हस्केच नेतृत्व करत होते. शिंदेंच्या हातात सगळं देऊ नका. आम्हाला काम करू दिलं जात नाही. महापालिकेत कसा भ्रष्टाचार केला जातो, अशा तक्रारी करणारे म्हस्के होते. आमच्याकडे रेकॉर्डवर त्यांची पत्रे आहेत, असा पलटवार संजय राऊत यांनी केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.