Maharashtra politics : ठाकरेंनंतर पवारांना धक्का? ६ खासदार अस्वस्थ, माजी मुख्यमंत्र्यांच्या दाव्याने खळबळ; नेमकं काय म्हणाले?

Sharad Pawar latest News : महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवार यांच्या पक्षातील ५ ते ६ खासदार अस्वस्थ असल्याचा दावा केला आहे.
Maharashtra Politics:
NCP SHARAD PAWAR Saam tv
Published On

Prithviraj Chavan Sharad Pawar Latest Marathi News : महाराष्ट्राच्या राजकारणातून धक्कादायक आणि खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवार यांचे ६ खासदार साथ सोडण्याच्या तयारी असल्याचा दावा केला आहे. उद्धव ठाकरेंसोबत जे केले, तेच शरद पवार यांच्यासोबत मोदी-शाह सरकार करत असल्याचा खळबळजनक दावा चव्हाण यांनी केला आहे.

गेल्या आठवड्यात शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएत जाणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. जयंत पाटील आणि भाजप खासदार विनोद तावडे यांच्यामध्ये गुप्त बैठक झाल्याच्या बातम्याही झळकल्या होत्या. त्यातच बुधवारी शरद पवार यांनी अचानक एकनाथ शिंदेंची भेट घेतली. त्यामुळे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएला पाठिंबा देणार की कोणत्या पक्षात विलीन होणार? अशी चर्चा सुरू झाली होती. ही चर्चा सुरू असतानाच पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या दाव्याने राज्यात खळबळ उडाली आहे.

Maharashtra Politics:
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यावर पुढच्या आठवड्यात ₹१५०० येणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

शरद पवार यांचे ८ खासदार आहेत, त्यापैकी ५ ते सहा खासदार अस्वस्थ असल्याचा दावा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. यामुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ठाकरेसेनेतील काही खासदारांनी आधीच पक्षाला रामराम ठोकला आहे, त्यामुळे राज्यातील विरोधी पक्षाची ताकद कमी झाली आहे. त्यातच आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाबाबत मोठे दावे केले जात आहेत.

Maharashtra Politics:
Shirdi Sai Baba : शिर्डीला दर्शन घ्यायला जाताय? VIP दर्शन महागलं, आता किती रूपयांना मिळणार पास?

पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले ?

शरद पवार यांचे 5 ते ६ खासदार अस्वस्थ आहेत. ते काय करतील माहिती नाही. त्यामागे मोदी-शाह सरकार हात धावून लागले आहे. त्यांना देशातील विरोधी पक्ष अस्तित्वात नसावा असे वाटतेय. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत जे केले, तेच त्यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत करायचे आहे. सध्या अस्थिर परिस्थिती आहे. खासदार शरद पवारांना सोडून जातील की नाही माहिती नाही, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.

Maharashtra Politics:
Rent Agreement: रेंट एग्रीमेंट संपण्यापूर्वीच भाडेकरूने घर सोडल्यास डिपॉझिटचे काय होते? घरमालक पैसे जप्त करू शकतो का?

गेल्या महिन्यात उद्धव ठाकरेंच्या ६ खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता, त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही खासदार नाराज असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादीच्या ८ खासदारांपैकी कोणते ६ खासदार नाराज आहेत? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्याने राज्याच्या राजकारण पुन्हा एकदा तापलेय.

Maharashtra Politics:
IMD Weather Update: १३ राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात शुक्रवारी कसं असेल हवामान, पाहा अपडेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com