Maharashtra Politics: अजित पवारांनंतर राष्ट्रवादी कमकुवत करण्याचा प्रयत्न; ज्येष्ठ नेत्यानं व्यक्त केला संशय, भाजपकडून भूमिका स्पष्ट

NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी पक्ष कमकुवत केला जात असल्याचा गंभीर आरोप केला.
Maharashtra Politics: अजित पवारांनंतर राष्ट्रवादी कमकुवत करण्याचा प्रयत्न; ज्येष्ठ नेत्यानं व्यक्त केला संशय, भाजपकडून भूमिका स्पष्ट
Maharashtra PoliticsSaam Tv
Published On: 

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विलिनीकरण होणार यावरून आता जोरदार राजकारण सुरू आहे. दोन्ही पक्षांच्या भेटीगाठी सुरू आहेत. यावरूनच लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. या विलिनीकरणाच्या चर्चेवरून संजय राऊत यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर सडकून टीका केली. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी 'अजितदादा गेल्यानंतर आमच्या पक्षाला कुमकुवत करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.', असा आरोप केला. यावरून आता राजकारण तापले आहे. हसन मुश्रीफांच्या आरोपावर भाजपचे नेते नवनाथ बन, ठाकरेसेनेचे नेते संजय राऊत, काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी प्रत्युत्तर दिले.

हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे २५-३० आमदार फुटणार असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले. संजय राऊत हे महान नेते आहेत. ते राज्याचे मुक्त विद्यापीठ आहे. त्यांनी काय बोलावे काय बोलू नये यावर कुणाचे बंधन नाही. आमच्या पक्षाची त्यांना काळजी लागली आहे. त्यांच्या पक्षाचे किती खासदार- आमदार गेले आले त्याबद्दल ते वक्तव्य करत नाही. विनाकारण ते आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ते सातत्याने टीका करत आहेत. त्यांनी आमच्या पक्षावर वक्तव्य करून नाक खुपसण्याची गरज नाही.

Maharashtra Politics: अजित पवारांनंतर राष्ट्रवादी कमकुवत करण्याचा प्रयत्न; ज्येष्ठ नेत्यानं व्यक्त केला संशय, भाजपकडून भूमिका स्पष्ट
NCP Merger : पुन्हा भूकंप होणार? अजित पवार गटाच्या आमदारांनी मागितली शरद पवारांची वेळ, काहीतरी मोठं घडणार?

शिंदेगटाचे नेते देखील राष्ट्रवादी काँग्रेसवर वाईट पद्धतीने टीका आणि बिनबुडाचे आरोप करत आहेत. त्यांना देखील हसन मुश्रीफ यांनी उत्तर दिले. अजितदादा गेल्यानंतर आमच्या पक्षाला कमकुवत करण्याचे प्रयत्न केले जात आहेत, असा आरोप मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. ते म्हणाल, 'समन्वय समितीत आमच्या ३ पक्षाची समिती आहे. त्यात चर्चा होते. महायुतीत तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर बोलायचं नाही. काही तक्रारी असतील तर एकमेकांच्या कानावर घालायच्या. हे अनेक वेळा झालं तरी हे बोध घेत नाही. एकनाथ शिंदे यांनी या नेत्यांना कडक शब्दात समज दिली पाहिजे. महायुतीत खडा टाकण्याचा प्रकार संजय शिरसाट आणि शिंदेसेनेचे इतर नेते करत आहेत. त्यांनी यापासून लांब राहावे. तिन्ही पक्षात वाद होणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे.'

Maharashtra Politics: अजित पवारांनंतर राष्ट्रवादी कमकुवत करण्याचा प्रयत्न; ज्येष्ठ नेत्यानं व्यक्त केला संशय, भाजपकडून भूमिका स्पष्ट
NCP Merger: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीचे २०-२२ आमदार फुटणार, बड्या नेत्याच्या दाव्याने राजकारणात खळबळ

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर हसन मुश्रीफ म्हणाले की, 'सुनेत्रा पवार वहिनीच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व आमदार एकत्र आहोत. कुणीही आमदार कुठे जाणार नाही आणि तिसरा गट होण्याची शक्यताच नाही. सुनेत्रा वहिनी विलिनीकरणाबाबत योग्य निर्णय घेतील आणि त्या पक्षाचे नेते शरद पवार देखील निर्णय घेतील. सुनेत्रा पवार जो निर्णय घेतील त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ठामपणे उभा राहिल. शरद पवार यांना भेटणार याबाबत मला काही निरोप आला नाही. कोण आमदार भेटणार याची मला कल्पना नाही. विनाकारण एखाद्याच्या पक्षाची बदनामी करणं. एखाद्या पक्षाचा नेता विमान अपघातात गेला आहे त्या पक्षाला कुमकुवत करण्याचे प्रयत्न हे नेते करत आहेत. पण त्यांचा हा डाव कधीच यशस्वी होणार नाही.'

Maharashtra Politics: अजित पवारांनंतर राष्ट्रवादी कमकुवत करण्याचा प्रयत्न; ज्येष्ठ नेत्यानं व्यक्त केला संशय, भाजपकडून भूमिका स्पष्ट
NCP Merger: मोठी बातमी! जशी वेळ येईल तशा गोष्टी कळतील, विलिनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

संजय राऊत यांनी पुन्हा विलिनीकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले की, 'विलिनीकरणाबाबत अनेक वर्ष मी ऐकत आहे. नकार कुणीच देत नाही. राष्ट्रीय स्पर्धेत, ऑलिम्पिकमध्ये नवीन खेळ आणला पाहिजे विलीनीकरण-विलीनीकरण, मर्जर-मर्जर, असे पत्र मी पंतप्रधानांना पवारांच्या शिफारसीने लिहणार आहे. मोठे मोठे खेळाडू सहभागी आहेत. प्रफुल पटेलांनी स्थापन करावी. आयपीएल चाललाय त्यांचा. मर्जर अजून गल्लीत खेळतायत. तुम्ही जे रिपोर्टिंग करताय ते मनोरंजक.' तसंच, 'हा सामना शेवटपर्यंत अनिर्णित राहिल. आमचा पक्ष लक्ष ठेवून नाही. पवार विलिनीकरण खेळात सहभागी असतील असं वाटत नाही. मुख्यमंत्र्यांना पंच म्हणून काम करायचंय. त्यांना फिक्सिंग करायची आहे. आधी निकाल फिक्स करा मग मॅच खेळा.', असा टोला संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांना लगावला. '

Maharashtra Politics: अजित पवारांनंतर राष्ट्रवादी कमकुवत करण्याचा प्रयत्न; ज्येष्ठ नेत्यानं व्यक्त केला संशय, भाजपकडून भूमिका स्पष्ट
NCP Merger : विलीनकरणाच्या चर्चेदरम्यान मोठा राजकीय ट्विस्ट! बीडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे दिग्गज नेते एकत्र, नेमकं काय चाललंय?

भाजपचे नेते नवनाथ बन यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, 'कोणताही पक्ष कमकुवत होत नाही. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे काम करत आहे. अजित पवार यांच्यासारखे नेते गेल्यावर नक्कीच परिणाम होतो. मात्र सुनेत्रा पवार सक्षम आणि समर्थ आहेत. सहकाऱ्यांची साथ देखील मिळते, राष्ट्रवादी सक्षम व्हावी यासाठी प्रयत्न करत आहेत. अजित पवार गेल्याची उणीव नक्कीच असेल मात्र उंचीवर नेण्याचे काम सुनेत्रा पवार नक्कीच करतील. कोणीही कोणत्या पक्षाला कमकुवत करण्याचे काम करत नाहीत.'

काँग्रेसचे नेते अतुल लोंढे यांनी देखील यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.'अजितदादांच्या अपघातानंतर त्याची चौकशी होत नाही हे दुर्दैव आहे. अजितदादा आणि रोहित पवार हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकत्र बसून जागावाटप करत होते. त्यांनी युती सरकारच्या काळात झालेल्या भ्रष्टाचारावर भाष्य केलं होतं. त्याचे कागदपत्र आपल्याकडे असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे अजितदादा जर हयात असते तर ते महाविकास आघाडीच्या माध्यमातून मुख्यमंत्री झाले असते.', असे विधान अतुल लोंढे यांनी केले. यावेळी त्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर देखील टीका केली. ते म्हणाले की, 'आपली ईडीतून मुक्तता कशी झाली? हे सांगा. लोकांना त्याचा फायदा होईल.'

Maharashtra Politics: अजित पवारांनंतर राष्ट्रवादी कमकुवत करण्याचा प्रयत्न; ज्येष्ठ नेत्यानं व्यक्त केला संशय, भाजपकडून भूमिका स्पष्ट
NCP Merger : सुनेत्रा पवारांचं विलिनीकरणावर सूचक विधान, नेमका अर्थ काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.