राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची? शिवसेना पक्ष-चिन्हावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असतानाच सुप्रिया सुळेंचा मोठा दावा

Supriya Sule Slams Election Commission: शिवसेना कुणाची याची सुनावणी सुप्रिम कोर्टात सुरु असताना आता पवारांच्या राष्ट्रवादीनंही आयोगाविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय. राज्याच्या राजकारणात पुन्हा पक्षफोडीवरून नवीन काय सुरू आहे? सुप्रिया सुळेंनी काय मोठा आरोप केलाय? पाहूयात या रिपोर्टमध्ये....
Supriya Sule says Sharad Pawar’s NCP is the real Nationalist Congress Party
Supriya Sule says Sharad Pawar’s NCP is the real Nationalist Congress Partysaam tv
Published On

शिवसेना पक्ष आणि चिन्हावरून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद सुरू आहे. सलग चार दिवस चाललेल्या युक्तिवादात ठाकरेसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीचे सुप्रीम कोर्टात वाभाडे काढले. याच मुद्यावरून पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनीही निवडणूक आयोगावर हल्लाबोल केलाय. बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेना जशी उद्धव ठाकरेंची आहे तशीच राष्ट्रवादी काँग्रेस ही शरद पवारांची असल्याचा दावा सुप्रिया सुळेंनी केलाय. तसंच निवडणूक आयोगानं अन्याय केल्याची टीका त्यांनी केलीय. त्यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांना मार्मिक उत्तर दिलंय.

ठाकरेसेनेनंही सत्ताधाऱ्यांसह निवडणूक आयोगावर निशाणा साधलाय. खासदार संजय राऊतांनी अमित शाहांसह निवडणूक आयोगावर शेलक्या शब्दांत टीका केलीये.

ठाकरेसेनेचा सुरू असलेला युक्तिवाद पाहून आता पवारांच्या राष्ट्रवादीतही उत्सहाचं वातावरण निर्माण झाल्याचं दिसतंय. त्यामुळे पवारांची राष्ट्रवादीही सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीसाठी पुढे काय रणनीती आखणार याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com