

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चेदरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे २० ते २२ आमदार फुटण्याची शक्यता असल्याचे मोठं विधान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत मोठं विधान केले. सुनेत्रा पवार यांच्या गटाचे आमदार आज शरद पवार यांची भेट घेण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच संजय राऊत यांनी हा दावा केल्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.