NCP Merger : पुन्हा भूकंप होणार? अजित पवार गटाच्या आमदारांनी मागितली शरद पवारांची वेळ, काहीतरी मोठं घडणार?

Maharashtra NCP merger speculation : राष्ट्रवादी काँग्रेसमधील विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा वेग येण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाच्या आमदारांनी शरद पवार यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितल्याची माहिती समोर आली आहे.
NCP Merger Politics:
NCP Merger Politics: saam tv
Published On: 

Ajit Pawar NCP MLA Sharad Pawar meeting latest news : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या आमदारांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितली आहे. आगामी बुधवारी ही भेट व्हावी, यासाठी सूत्रांनुसार वेळ मागण्यात आल्याची माहिती मिळत आहे. शरद पवारांकडून अद्याप वेळ देण्यात आल्याबाबत माहिती समोर आलेली नाही.

प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यावेळी १० तारखेला आपण भेटून बोलूयात, असे म्हटले होते. त्यानंतर विलिनीकरणाच्या चर्चेला वेग आला होता. आता त्यातच अजित पवार गटाच्या सर्व आमदारांनी शरद पवार यांची भेटीसाठी वेळ मागितली आहे, त्यामुळे विलिनीकरणाच्या चर्चेला आणखी वेग आला आहे. आज सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांची बारामतीत भेट घेतली. त्यांच्यामध्ये ४५ मिनिटे चर्चा झाली होती.

सिल्व्हर ओकवर राजकीय घडामोडींना वेग

दरम्यान, नुकतीच पंकज भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. शरद पवार हे सध्या मुंबईतच असून, प्रकृतीच्या कारणास्तव पुढील काही दिवस ते आपल्या 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी आराम करणार असल्याचे पवार कुटुंबीयांकडून सांगण्यात आले आहे.

NCP Merger Politics:
NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्र्यांचे मोठं वक्तव्य, म्हणाले शरद पवार...

भेटीसाठी वेळेची प्रतीक्षा

अजित पवार गटाच्या आमदारांनी शरद पवारांना भेटण्यासाठी उत्सुकता दाखवली असली, तरी अद्याप शरद पवार यांच्याकडून या भेटीसाठी कोणतीही वेळ देण्यात आलेली नाही. पंकज भुजबळांच्या भेटीनंतर आता थेट आमदारांनीच भेटीची इच्छा व्यक्त केल्यामुळे, ऐन सणासुदीच्या आणि राजकीय चर्चांच्या वातावरणात 'सिल्व्हर ओक'वर नक्की काय शिजते आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

NCP Merger Politics:
NCP Merger : राष्ट्रवादीत विलीनीकरणाऐवजी तिसरा गट पडेल; महायुतीच्या मंत्र्याची शंका, राजकीय वर्तुळात ट्विस्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.