NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्र्यांचे मोठं वक्तव्य, म्हणाले शरद पवार...

NCP Merger Speculation: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे वक्तव्य केले आहे. विलिनीकरणाबाबत शरद पवार आणि सुनेत्रा पवार हेच स्पष्ट सांगू शकतात, असे ते म्हणाले.
NCP Merger in Pune
Leaders announce joint political move in Junnar, signalling the first step toward NCP reunification in Pune district.saam tv
Published On: 

NCP merger latest news, Devendra Fadnavis on NCP merger : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (एनसीपी) विलिनीकरणाच्या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत फक्त दोनच व्यक्ती सांगू शकतात—एक शरद पवार आणि दुसऱ्या सुनेत्रा वहिनी! विलिनीकरण करण्याचे जर ठरवले तर ते आम्हाला सांगतीलच, मात्र अजून तरी आम्हाला याबद्दल काहीही कळवले नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी अनौपचारिक चर्चेवेळी सांगितले.

गोकुळ दूध संघाच्या वादावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मी नेहमी कायदा आणि संस्थेच्या पाठीशी उभा आहे. गोकुळ संदर्भात आधीच सांगितले होते की तिथे एक प्रकारे वैधानिक (Legal) पेच निर्माण झाला होता. एका गटाकडे १३ तर दुसऱ्या गटाकडे १२ असे संख्याबळ झाल्यामुळे कोरम पूर्ण होत नव्हता आणि कोणालाही एकाच्या भरोश्यावर अध्यक्ष करता येत नव्हते.

सरकारला वाटले असते तर निवडणुकीनंतर लगेच संचालक टाकले असते, तसेच डीडीआर (DDR) पण असतो; मात्र कोरमसाठी बहुमत नाही हे लक्षात आल्यानंतर निर्णय घेण्यात आला. उच्च न्यायालयात काल झालेल्या सुनावणीत अध्यादेशात कोणताही दोष (Defect) नाही, असे सांगण्यात आले आहे. तसेच चार जणांची मते वेगळी ठेवा आणि निवडणूक पूर्ण करा, असे न्यायालयाने म्हटले आहे.

NCP Merger in Pune
५०० रुपयांची नोट बंद करा, मुख्यमंत्र्यांची थेट मोदींकडे मागणी

सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी एकत्र येऊन निर्णय घेतला असता तर संचालक पाठवले नसते, असे स्पष्ट करत मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, या प्रकरणाला राजकीय रंग देण्यात आला आणि यात राहुल गांधी देखील उतरले. सहकार क्षेत्रात अनुभव असलेल्यांनाच गोकुळमध्ये नेमण्यात आले आहे. त्यात एखादा गायनॅकोलॉजिस्ट (स्त्रीरोगतज्ज्ञ) असेल तर त्यात चूक काय? असा सवालही त्यांनी केला. आता देशाच्या विरोधी पक्षनेत्याला जर यात लक्ष घालावे लागत असेल, तर गायनॅकोलॉजिस्ट तर अगदी साधा माणूस आहे, असे ते मिश्कीलपणे म्हणाले.

NCP Merger in Pune
दिवाळीत काळाचा घाला! काँग्रेस नगरसेविका आणि त्यांच्या पतीचा जिवंत जळून मृत्यू, फटाक्यांच्या दुकानात भीषण स्फोट

शेतकऱ्यांना दुष्काळातून सुखरूप बाहेर काढू

राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांना दुष्काळातून सुखरूप बाहेर काढले जाईल. पाण्याचे योग्य नियोजन केले असून सरकारकडून योग्य पातळीवर उपाययोजना सुरू आहेत. इतिहासात पहिल्यांदाच चाऱ्याचे दर निश्चित करण्यात आले आहेत. मोठ्या धरणांमध्ये पाणीसाठा चांगला असून त्यासाठीही योग्य नियोजन केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबईची सुरक्षा आणि बिश्नोई टोळीवर कडक कारवाई

पूर्वी मुंबईचे पोलीस देशात नंबर २ वर होते, मात्र आता ते नंबर १ झाले आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. बिश्नोई टोळीबाबत लोकांमध्ये भीती निर्माण करण्याची खेळी आहे. सध्या चार लोक हे रॅकेट ऑपरेट करत असून, त्यातील एकाला परदेशात अटक करण्यात आली आहे, तर दुसऱ्याला अटक करण्यासंदर्भातही नियोजन सुरू आहे. मुंबईत गोळीबार झाल्यावर पोलिसांनी तत्काळ पावले उचलत आरोपींना गाठले आणि रेल्वेतून उतरवून अटक केली, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.