५०० रुपयांची नोट बंद करा, मुख्यमंत्र्यांची थेट मोदींकडे मागणी

Chandrababu Naidu latest news : ५००, १००० आणि २००० रुपयांच्या नोटा चलनातून हटवण्याची मागणी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पुन्हा केली आहे. फक्त १०० आणि २०० रुपयांच्या नोटा चलनात ठेवण्याची त्यांची सूचना आहे.
500 rupee notes
500 rupee notes
Published On: 

Will 500 rupee notes be banned in India : देशातून भ्रष्टाचार आणि काळा पैसा पूर्णपणे नष्ट करण्यासाठी थेट ५००, १००० आणि २००० रुपयांच्या मोठ्या नोटा चलनातून पूर्णपणे बंद करण्याची मागणी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीनंतर ५०० रूपयांच्या नोटा बंद होणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. आरबीआय किंवा सरकारकडून निर्णय घेतला जाणार का? यामागचे नेमके कारण काय आहे, अशी चर्चा रंगली आहे.

काय आहे मागणीचे कारण?

५००, १००० आणि २००५ नंतर आलेल्या २००० च्या नोटा जवळ बाळगणे सोपे असते. यामुळे मोठ्या प्रमाणावर काळा पैसा लपवणे, बेकायदेशीर व्यवहार करणे आणि लाचखोरी करणे सोपे होते. त्यामुळे या नोटांची छपाईच पूर्णपणे थांबवावी आणि त्या चलनातून काढून घ्याव्यात, असे चंद्रबाबू नायडू म्हणाले.

मोठ्या मूल्याच्या नोटांच्या वापरावर मर्यादा घातल्यास अवैध कारवायांना आणि निवडणुकीच्या राजकारणातील 'पैशाच्या ताकदीला' आळा बसेल, असा विश्वास मुख्यमंत्री नायडू यांनी व्यक्त केला. त्यांच्या मते, रोख व्यवहारांसाठी केवळ १०० आणि २०० रुपयांच्या नोटा चलनात राहाव्यात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोख रकमेची अवैध साठवणूक किंवा वाहतूक करणे अत्यंत कठीण होईल. त्याशिवाय डिजिटल पेमेंट वाढेल.

500 rupee notes
दिवाळीत काळाचा घाला! काँग्रेस नगरसेविका आणि त्यांच्या पतीचा जिवंत जळून मृत्यू, फटाक्यांच्या दुकानात भीषण स्फोट

नोटा छाडणे खरंच बंद होणार का?

सध्या ५०० रुपयांची नोट मोठ्या प्रमाणावर चलनात आहे. तर २००० रुपयांची नोट यापूर्वीच आरबीआयने मागे घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र ५०० आणि इतर मोठ्या नोटा पूर्णपणे बंद करण्याबाबत सरकार किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) कोणताही अधिकृत निर्णय घेतलेला नाही. अथवा तशी घोषणा केलेली नाही. ही फक्त एका बाजूने समोर आलेली मागणी आहे. त्यामुळे सध्या तरी कोणतीही नवीन नोट बंद होणार नाही.

५०० रुपयांच्या नोटांचा पुरवठा किंवा छपाई थांबवण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही. त्या चलनात राहतील, असे भारतीय रिझर्व्ह बँकेने आधीच स्पष्ट केले आहे.

500 rupee notes
गोकुळमधील २५ वर्षांची 'महाडिक सत्ता' संपली? यंदा त्या पॅटर्नला ब्रेक, अध्यक्षपदासाठी ४ नावं चर्चेत; कुणाची लागणार वर्णी?

५०० रुपयांची नोट छापायला किती खर्च येतो?

आरबीआयच्या अहवालानुसार ५०० रुपयांची नोट छापण्यासाठी अंदाजे २.२९ ते २.६५ रुपये खर्च येतो. १० आणि २० रुपयांच्या नोटा छापण्याच्या अंदाजे ९५ पैसे ते १.०१ रुपयांच्या खर्चापेक्षा जास्त आहे. ५०० रुपयांच्या नोटा छापण्याचा खर्च जास्त असतो कारण त्यांमध्ये प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये समाविष्ट असतात. १०० रुपयांच्या नोटेसाठी अंदाजे १.७७ रुपये, तर २०० रुपयांच्या नोटेसाठी अंदाजे २.३७ ते २.९३ रुपये खर्च येतो.

₹१,००० ची नोट तयार करण्यासाठी अंदाजे ₹२.६७ ते ₹३.५४ खर्च येतो. आरबीआयच्या नवीनतम वार्षिक अहवालानुसार (२०२५-२६), नवीन नोटा छापण्याच्या कमी मागण्यांमुळे नोटांच्या छपाईवरील एकूण खर्च गेल्या वर्षीच्या ₹६,३७२.८ कोटींवरून २३.५% ने कमी होऊन ₹४,८७५.२ कोटींवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.