राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावरुन सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरूय. दोन्ही पक्षांमध्ये नेत्यांनी भेटीगाठींचा सपाटा लावलाय. आज पुन्हा सिल्वर ओक बंगल्यात राजकीय खलबतं सुरू झाल आहेत. शरद पवार गटातील नेते सिल्वर ओकवर दाखल झाली आहेत. जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हेंसह अनेक नेते शरद पवारांच्या भेटीसाठी आले आहेत. दरम्यान ही बैठक कोणत्या मुद्द्यावरून होतेय, याची माहिती अद्याप हाती आली नाहीये. परंतु सध्या दोन्ही गटाच्या विलीनीकरणाची चर्चा सुरूय.
त्याच मुद्यावरून अजित पवार गटातील नेत्यांनी शरद पवारांकडे भेटीची वेळ मागितलीय. त्याआधी जयंत पाटील आणि अमोल कोल्हे हे सिल्वर ओकवर दाखल झालेत. दरम्यान आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने बारामती येथील निवासस्थानी भेट घेतली. जवळपास दोन्ही नेत्यांमध्ये ४५ मिनिटे चर्चा झाली. सुनेत्रा पवार उद्या पत्रकार परिषद घेणार असून त्यात ते विलीनीकरण निर्णयाची घोषणा करतील असं सांगितलं जातंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.