NCP Merger : सुनेत्रा पवारांचं विलिनीकरणावर सूचक विधान, नेमका अर्थ काय?

Sunetra Pawar Latest News : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चेदरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सूचक विधान केले आहे. 'जशी वेळ येईल, तशा गोष्टी कळतील,' असे म्हणत त्यांनी विलिनीकरणाबाबतचा सस्पेन्स कायम ठेवला.
Sunetra Pawar Latest News
Sunetra Pawar Latest News
Published On: 

विलिनीकरणाच्या चर्चेवरून दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी वेगवेगळे दावा केलेले असतानाच पहिल्यांदाच सुनेत्रा पवारांनी विलिनीकरणावर सूचक विधान केलयं.. त्यामुळे खरचं दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार का? विलिनीकरणावर सुनेत्रा पवारांची काय भूमिका आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

ऐकलतं... दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर अखेर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी आपलं मतं मांडलयं...एकीकडे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा दादांच्या राष्ट्रवादीचे नेते फेटाळून लावत असतानाच 'जशी वेळ येईल, तशा गोष्टी कळतील' असं म्हणत सुनेत्रा पवारांनी विलीनीकरणाचा सस्पेन्स अधिकच वाढवलाय...

मुळात गेल्या काही दिवसांपासून दादांच्या राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेते दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात यासाठी आग्रही आहेत...तर दादांच्या राष्ट्रवादीकडून शरद पवारांना विलिनीकरणाचा प्रस्ताव आला नसल्याचीही चर्चा आहे...तर दुसरीकडे दादांच्या आमदारांनीही शरद पवारांची भेट घेण्यासाठी वेळ मागितल्याची माहिती समोर येते असतानाच शरद पवारांनी आमदारांची भेट नाकारल्याची चर्चा आहे...मात्र आमदारांनी भेटीसाठी वेळ मागितलीच नाही, मग या चर्चा कशाला असा सवाल दादांच्या राष्ट्रवादीनं उपस्थित केलाय...

Sunetra Pawar Latest News
Ajit Pawar Death Controversy: अजितदादांचा अपघात नव्हे घातपात', दादांच्या राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांचाही दावा

दरम्यान गेल्या काही दिवसात राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेला कसा वेग मिळाला...पाहूयात.. राष्ट्रवादीतील घडामोडी

19 ऑक्टोबर -

पार्थ पवार, सुनेत्रा पवारांची अमित शहांशी भेट

पक्षातील इतर नेते अनुपस्थित

21 ऑक्टोबर -

सुनेत्रा पवार, पार्थ पवारांची मुख्यमंत्र्यांसह अमित शहांशी भेट

25 ऑक्टोबर

राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक, मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा निर्णय मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन अर्थ खात्याची मागणी

28 ऑक्टोबर -

पार्थ पवारांकडून उमेश पाटील, झिशान सिद्दिकी यांची नियुक्ती

1 नोव्हेंबर

सुनेत्रा-पार्थ पवारांशिवाय राष्ट्रवादी नेत्यांची अमित शहांसोबत भेट

2 नोव्हेंबर -

सुनेत्रा पवार, पार्थ पवारांची कोअर कमिटीसोबत बैठक

3 नोव्हेंबर

सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांसोबत बैठक

4 नोव्हेंबर -

पंतप्रधान मोदींचं रुग्णालयात असलेल्या पवारांसोबत फोनवरुन संभाषण

5 नोव्हेंबर -

रुग्णालयता शरद पवार आणि प्रफुल्ल पटेलांमध्ये 10 नोव्हेंबरनंतर भेटीबाबत चर्चा

6 नोव्हेंबर

अजितदादा असते विलिनीकरण झालं असतं, तटकरेंचं मोठं विधान

10 नोव्हेंबर

आमच्याशिवाय विलिनीकरण होणार नाही, असं मुख्यमंत्री फडणवीसाचं विधान

Sunetra Pawar Latest News
NCP Split : आता दादांची राष्ट्रवादी फुटणार? 20-22 आमदार बाहेर पडणार, खासदाराचा मोठा दावा

मुळात दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला भाजप हायकमांडचा ग्रीन सिग्नल दिल्याचं म्हटलं जातंय...त्यात सुनेत्रा पवारांनी विलिनीकरणाच्या मुद्दयावर थेट बोलण्याएवजी त्यातला सस्पेन्स कायम ठेवलाय.. त्यामुळे खरोखरच दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण कधी होईल हे काळच ठरवेल..

भरत मोहोळकर,साम टीव्ही, मुंबई

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.