आता बातमी अजितदादांच्या अपघातावरून निर्माण झालेल्या संशयाची. शिंदेसेनेनंतर आता थेट दादांच्या राष्ट्रवादीतच दादांच्या मृत्यूबाबत संशयाचा धूर निर्माण झालाय.तटकरेंवरील आरोपांनंतर आता दादांच्या पक्षातल्याच नेत्यांनी दादांचा घातपात झाल्याचा दावा केलाय. कोण आहे हा नेता? हा आरोप दादांच्या प्रेमापोटी आहे की तटकरेंना खिंडीत गाठण्यासाठी? पाहूयात हा रिपोर्ट .
अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर 10 महिने उलटले असले तरी याच दुर्देवी घटनेवरून सुरु झालेलं राजकारण काही केल्या थांबत नाहीये. अजित दादांच्या अपघाताच्या तपासावर पवार कुटुंबीयांनी देखील आक्षेप घेतला होता. मात्र आता दादांंच्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय प्रवक्त्यानेच दादांचा अपघात नसून घातपात असल्याची शंका उपस्थित केल्यानं पक्षांतर्गत वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांनी दादांच्या अपघातावर शंका उपस्थित करण्याआधी शिंदेसेनेच्या रामदास कदमांनी दादांच्या अपघातावरून सुनील तटकरेंना लक्ष्य केलं होतं..."उपमुख्यमंत्रिपदासाठी तटकरेंनीच अजितदादांचा घातपात केल्याचा खळबळजनक आरोप कदमांनी केला होता. त्याला तटकरेंनी कायदेशीर कारवाई इशारा दिला होता.
सुनील तटकरेंनी आपली भूमिका मांडल्यानंतर त्यांच्याच पक्षातल्या प्रवक्त्यानं पुन्हा अजितदादांच्या मृत्यूबाबत घातपाताची शंका उपस्थित केल्यामुळे पुन्हा एकदा संशयाचा धूर पसरलाय. मुळात उमेश पाटील आणि झिशान सिद्दीकींच्या नियुक्तीवरून पार्थ पवार आणि तटकरे-पटेल यांच्या वाद झाल्याची चर्चा रंगली होती. आणि त्यामुळेच तटकरेंना खिंडीत गाठण्याची संधी पार्थ पवार गटानं साधलीय की काय असा प्रश्न निर्माण झालाय. मात्र यावरून अंतर्गत राजकारण करण्यापेक्षा दादांच्या मृत्यूचं खरं कारण निदान त्यांच्या पक्षातल्या नेत्यांनी तरी शोधून काढावं अशीच अपेक्षा केवळ राष्ट्रवादीचीच नव्हे तर संपूर्ण राज्याची आहे.
ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.