मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरहून अचानक दिल्ली दौऱ्यावर जाणार
दिल्लीला जाण्यापूर्वी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी फडणवीसांची भेट घेतली
नागपूरमधील रामगिरी बंगल्यावर दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा
दुष्काळ, शेतकरी प्रश्न आणि मनोज जरांगे यांच्या उपोषणावर चर्चा झाल्याची शक्यता
राज्यामध्ये मोठी राजकीय घडामोड घडण्याची शक्यता आहे. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तडकाफडकी दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. दिल्ली दौऱ्यावर जाण्यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांची राज्यातील बड्या नेत्याने भेट घेतली. दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांच्या अचानक दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या दिल्ली दौऱ्यामागचे नेमकं कारण काय हे अद्याप समोर आले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर रवाना होणार आहेत. आज मुख्यमंत्री नागपूरवरुन थेट दिल्लीला जाणार आहेत. काही महत्त्वाच्या कामासाठी ते दिल्लीला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. दिल्ली ते भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यापूर्वी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची भेट घेतली.
चंद्रशेखर बावनकुळे आणि मुख्यमंत्री यांची नागपूरातील रामगिरी बंगल्यावर बैठक पार पडली. त्यानंतर मुख्यमंत्री दिल्लीसाठी जाणार आहेत. या दोन्ही नेत्यांमध्ये राज्यातील दुष्काळ, शेतकरी प्रश्न, मनोज जरांगे उपोषण यासर्व मुद्द्यांवर चर्चा झाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या भेटीमागचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही.
मुख्यमंत्र्यांनी नागपूर न्यायालयातील पदग्रहन कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी नागपूर न्यायालयाविषयी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, 'मागच्या टीमने चांगलं काम केलं त्यांचं अभिनंदन. नवीन टीमचं स्वागत आहे. नवीन टीमने अनेक मागण्या केल्या आहे. मागच्या टीमने एक बिल्डिंग मागितली होती ती झाली. नवीन टीमने नवीन कोर्ट मागितलं. नक्कीच नागपूर महत्वाचं ठिकाण आहे. त्यामुळे नवीन कोर्ट आवश्यक आहे. कारण जुन्या कोर्टमध्ये जागा कमी पडत आहे त्यामुळे ही मागणी पूर्ण होईल. गवईसाहेब म्हणाले मी माजी झालो. त्यामुळे फक्त विनंती करू शकतो पण गवईसाहेब तुम्ही आम्हाला मागणी केली ती सर न्यायाधीश यांची मागणी म्हणून पाहू.'
तसंच, 'किलोर साहेब यांनी निवडणूक लढतानाच्या अडचणी सांगितल्या. आमच्या समोर दर ५ वर्षांनी काय अडचणी येत असेल समजू शकता. आम्ही निवडणुकीत नमस्कार करता करता समोर कुत्रा आला तरी नमस्कार करत असतो. न्यायालयाच्या प्रक्रियेत अनेक सुधारणा होत आहे त्यात आणखी बदल होईल. नवीन लोकांचा पदग्रहन सोहळ्यासाठी माजी सर न्यायाधीश आले. यातून तुम्ही किती महत्वाचे आहे हे महत्वाचे आहे. गवई साहेब यांच्या कडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. आमच्याकडे विरोधी पक्ष नेता असतो त्याप्रमाणे तुमच्याकडे नसेल अशी अपेक्षा करतो.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.