

भाजप आणि शिंदेसेनेच्या आमदारांमध्ये बुलढाण्यात संघर्ष
बुलडाण्यात श्वेता महाले आणि संजय गायकवाड यांच्यात वाद
श्वेता महाले यांनी दहीहंडीत केले शक्तिप्रदर्शन
संजय गायकवाड यांचे श्वेता महालेंना जोरदार प्रत्युत्तर
राज्यात भाजप विरूद्ध शिंदेसेनेत ठिकठिकाणी संघर्ष सुरू असताना आता बुलढाण्यातही भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार एकमेकांना भिडले आहेत. नेमके कोण आहेत हे आमदार आणि कशावरून वाद पेटलाय? एका आमदारानं दुसऱ्याला काय धमकी दिलीय? पाहूयात या रिपोर्टमधून...
राज्यात भाजप आणि शिंदेसेनेत अनेक ठिकाणी संघर्ष सुरू असताना त्याला आता बुलढाणाही अपवाद नाही. बुलढाण्यात स्थानिक राजकारणातील वर्चस्वावरून भाजप आणि शिंदेसेनेच्या आमदारांमध्ये संघर्ष निर्माण झालाय. चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांनी दहीहंडी उत्सवात शिंदेसेनेचे स्थानिक आमदार संजय गायकवाड यांच्या मतदारसंघात शक्तिप्रदर्शन केलं.
एवढंच नव्हे तर या शक्ती प्रदर्शनावेळी महालेंनी बाप तो बाप रहेगा या गाण्यावरुन गायकवाडांना डिवचण्याचा प्रयत्नही केला. याला संजय गायकवाडांनी थेट चिखलीत जाऊन दहीहंडीचं आयोजन करून जोरदार प्रत्युत्तर दिलंय. मात्र यावेळी त्यांनी महालेंना नाव न घेता धमकावलं. नेमका दोघांमध्ये कसा वाद रंगला ते पाहा...
खरंतर, राज्य मंत्रिमंडळात मंत्र्यांच्या निर्णयांना कात्री लावल्यानं आधीच शिंदेसेनेत नाराजीचा सूर आहे. त्यात आता स्थानिक राजकारणावरुन पुन्हा एकदा महायुतीमधील आमदारांमध्ये मतभेद तीव्र होत चालले आहेत. त्यामुळे पुढील काळात स्थानिक राजकारणातही भाजप आणि शिंदेसेनेतील संघर्ष आणखीन तीव्र होण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.