Maharashtra Politics: शरद पवारांच्या जवळच्या नेत्याच्या अडचणी वाढल्या, 'ते' वक्तव्य भोवलं; पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

MPSC Paper Leak Case: एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते मेहबूब शेख यांनी भाजपच्या आमदाराबाबत वादग्रस्त विधान केले होते. या प्रकरणी त्यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Maharashtra Politics: शरद पवारांच्या जवळच्या नेत्याच्या अडचणी वाढल्या, 'ते' वक्तव्य भोवलं; पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
NCP SHARAD PAWAR Saam tv
Published On
  1. एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी महबूब शेख यांच्याविरोधात तक्रार

  2. महबूब शेख यांनी अभिमन्यू पवारांवर केलेल्या आरोपांवरून वाद

  3. एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात राजकीय कनेक्शनचा आरोप

  4. अभिमन्यू पवारांच्या कार्यकर्त्याची महबूब शेख यांच्याविरोधात तक्रार

  5. औसा पोलिस ठाण्यात महबूब शेख यांच्याविरोधात तक्रार

राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते महबूब शेख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मेहबूब शेख यांच्याविरोधात औसा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात भाजपचे आमदार अभिमन्यू पवारांचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी भाजप आमदार अभिमन्यू पवार यांची बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते मेहबूब शेख यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आमदार अभिमन्यू पवार यांच्या कार्यकर्त्याने औसा पोलिसात मेहबूब शेख यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. एमपीएससी पेपर फुटीतील आरोपींसोबत आमदार अभिमन्यू पवारांचे थेट सबंध असल्याचा आरोप महबूब शेख यांनी केला होता.

Maharashtra Politics: शरद पवारांच्या जवळच्या नेत्याच्या अडचणी वाढल्या, 'ते' वक्तव्य भोवलं; पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचं पुन्हा ऑपरेशन टायगर, ठाकरे गटाचे 14 आमदार फुटणार?

मात्र एमपीएससी पेपर फुटीप्रकरणात आमदार अभिमन्यू पवार यांचा कुठलाही थेट सबंध नसल्याचे सांगत ही केवळ अभिमन्यू पवारांची बदनामी केली जात असल्याचे सांगत मेहबूब शेख यांच्याविरोधात औसा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळाच चर्चा होऊ लागली आहे. आता पोलिस या प्रकरणी मेहबूब शेख यांच्याविरोधात काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे राहिल.

Maharashtra Politics: शरद पवारांच्या जवळच्या नेत्याच्या अडचणी वाढल्या, 'ते' वक्तव्य भोवलं; पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
Maharashtra Politics: रायगडमध्ये मोठा राजकीय भूकंप! तटकरेंनी ठाकरेंचा जवळचा नेता फोडला, पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादीत जाहीर पक्षप्रवेश

एमपीएससी पेपरफुटी प्रकरणामध्ये ६ जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आता राजकीय कनेक्शन असल्याचे समोर येत आहे. याबाबत शरद पवार गटाचे नेते मेहबूब शेख यांनी आवाज उठवला आहे. एमपीएससीचा पेपर फुटलेला आहे मात्र एमपीएससीने हे सगळं नाकारलं होतं. यावर मेहबूब शेख यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी बोलताना मेहबूब शेख यांनी सांगितले होते की, 'आता दूध का दूध पाणी का पाणी झालं. एमपीएससी हे नाकारणारच. कारण याची पाळंमुळं एमपीएससीमध्ये आहेत. पेपरफुटीचा जो मेन डिस्ट्रीबुटर आहे हा एमपीएससीत बसलेला आहे. आता जी अटक झाली ती दलालाला आणि ग्राहकांना अटक झाली. पण मेन म्होरक्या आहे याचा मास्टर माइंड हा एमपीएससीमध्ये नागासारखा ठाण मांडून बसला आहे.'

Maharashtra Politics: शरद पवारांच्या जवळच्या नेत्याच्या अडचणी वाढल्या, 'ते' वक्तव्य भोवलं; पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
Maharashtra Politics: मोठी बातमी! शिंदेंच्या जवळच्या मंत्र्याला झटका, महत्वाच्या अधिकाराला कात्री; राजकीय वर्तुळात खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com