MPSC News : एमपीएससी भरती प्रक्रियेत मोठे बदल; उमेदवारांसाठीचे २ पर्याय रद्द करण्याचा निर्णय

MPSC cancels opting out and consent options : एमपीएससी भरती प्रक्रियेत मोठे बदल करण्यात आले आहेत. उमेदवारांसाठी असलेले दोन पर्याय रद्द करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.
एमपीएससी भरती प्रक्रियेत मोठा बदल, २ पर्याय रद्द करण्याचा निर्णय
MPSC NEWS UPDATEsaam tv
Published On

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) भरती प्रक्रियेत महत्त्वाचा बदल करत उमेदवारांना उपलब्ध असलेले ‘ऑप्टिंग आऊट’ तसेच ‘संमती’ (Give Up / Accepted) हे पर्याय रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्ध केले आहे. आयोगाने भरती प्रक्रियेत सुधारणा करण्याच्या उद्देशाने यापूर्वी ‘ऑप्टिंग आऊट’ ही संकल्पना लागू केली होती. त्यानुसार निवड यादीतील उमेदवारांना भरती प्रक्रियेतून स्वेच्छेने बाहेर पडण्याचा पर्याय देण्यात आला होता. मात्र, या पर्यायासंदर्भात आयोगाच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर आता हा पर्याय रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यापुढे आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षांसाठी भरती प्रक्रियेतून बाहेर पडणे (Opting Out) तसेच संमती (Give Up / Accepted) देणे हे पर्याय उपलब्ध राहणार नाहीत. एकल संवर्गाच्या भरती प्रक्रियेसाठी प्रतिक्षा यादी कार्यान्वित राहील व बहुसंवर्गीय पदांच्या भरती प्रक्रियेसाठी प्रतिक्षा यादी राहणार नाही.

एमपीएससी भरती प्रक्रियेत मोठा बदल, २ पर्याय रद्द करण्याचा निर्णय
NEET पेपर फुटी प्रकरणात मोठी अपडेट; भाजप नेत्याला अटक, माजी मुख्यमंत्र्यांच्या दाव्याने खळबळ

बहुसंवर्गीय पदभरतीत उमेदवाराला ज्या पदावर अगोदरच नियुक्ती मिळाली आहे अशा पदाचा किंवा निम्न पदाचा पर्याय उमेदवाराने पसंतीक्रमात दिल्यास त्याचा त्या पदावरील किंवा निम्न पदावरील शिफारशीसाठी विचार केला जाणार नाही.

हा निर्णय प्रसिद्धीपत्रकाच्या दिनांक १३ मे २०२६ पासून अंमलात येणार असल्याचे आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.

एमपीएससी भरती प्रक्रियेत मोठा बदल, २ पर्याय रद्द करण्याचा निर्णय
NEET परीक्षा कधी जाहीर होणार? महत्त्वाची अपडेट समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com