NEET पेपर फुटी प्रकरणात मोठी अपडेट; भाजप नेत्याला अटक, माजी मुख्यमंत्र्यांच्या दाव्याने खळबळ

NEET paper leak : NEET पेपर फुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पेपर लीक प्रकरणात भाजप नेता असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्र्यांनी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
paper leak row news
paper leak row Saam tv
Published On
Summary

नीट पेपर लीक झाल्याने खळबळ

नीटर पेपर फुटी प्रकरणाचे राजस्थान कनेक्शनही उघड

नेटर पेपर लीक करणारा आरोपी भाजप नेता असल्याचा काँग्रेसचा आरोप

नीट पेपर फुटी प्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. या पेपर फुटी प्रकरणी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून संशियतांना अटक केली जात आहे. या प्रकरणातील पहिल्या संशयित आरोपीला नाशिकमधून अटक करण्यात आली. आता राजस्थानमधून एकाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपी दिनेश बिंवाल याला अटक केली आहे. दिनेश हा भाजप नेता असल्याचा आरोप काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनीही केला आहे. या आरोपावर भाजपने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

काँग्रेसने दिनेश बिंवाल आणि भाजपचे पोस्टर शेअर केले आहेत. काँग्रेसने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'दिनेश बिंवाल भाजप नेता आहे. भाजप नेता दिनेश पेपर लीक माफिया आहे. या प्रकरणात त्याचा हात आहे. दिनेशने आधी ३० लाखात NEET 2026 चा पेपर खरेदी केला. त्यानंतर त्याने पेपर लाखो रुपयांमध्ये विकला. पुढे सोशल मीडियाच्या विविध ग्रुपमध्ये फॉरवर्ड केला.

'दिनेशने भाजपच्या संरक्षणात लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त केले.ही पहिली घटना नाही. भाजप सरकारच्या काळात पेपर फुटी माफियाने लाखो कुटुंबीयांचे आयुष्य उद्ध्वस्त केले. भाजप सरकार हे पेपर फुटी माफियाचे भागीदार आहे, असा आरोप काँग्रेसने केला. राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी भाजपवर गंभीर आरोप केला. 'बिंवाल हा भाजप पदाधिकारी आहे. यामुळे पेपर लीक प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप गहलोत यांनी केला.

paper leak row news
काँग्रेसचे टेन्शन वाढलं, आमदार नितीन राऊत नाराज; थेट दिला पक्ष सोडण्याचा इशारा

गहलोत यांनी म्हटलं की, नीट पेपर लीक प्रकरणात अटक करण्यात आलेला दिनेश बिंवाल हा भाजप पदाधिकारी आहे. यामुळे राजस्थानच्या भाजप सरकारने नीट पेपर फुटी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. यात प्रकरणात FIR देखील नोंदवण्यात आलेला नाही. मी ११ मे रोजी पासून FIR दाखल करण्यात येत नसल्याचे म्हणतोय. भाजपची पोलखोल झाली आहे. भाजप सरकार युवकांच्या भविष्यांशी खेळत असून पेपर लीक माफियाला अभय देत आहे'.

paper leak row news
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याच्या कारवर हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

नीट पेपर लीक प्रकरणात जयपूरच्या जामवा रामगढ येथून दिनेश आणि त्याचा भाऊ मांगीलाल याला ताब्यात घेण्यात आलं आहे. दिनेश हा भाजप नेता असल्याचा काँग्रेसचा दावा आहे. अशोक गहलोत यांनी त्याच्याशी संबंधित एक पोस्टर देखील शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये दिनेश हा भाजयुमो जिल्हा मंत्री, जयपूर देहात असल्याचे लिहिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com