राष्ट्रवादीच्या महिला नेत्याच्या कारवर हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

NCP Leader Attack : धुळ्यात राष्ट्रवादीच्या नेत्याच्या कारवर पहाटे हल्ला झाल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांता गुन्हा नोंदवण्यात आला आहे .
NCP Leader Attack
NCP Leader Attack Saam tv
Published On
Summary

राष्ट्रवादीच्या महिला नेत्याच्या कारवर हल्ला

महिला नेत्या रिता बाविस्कर यांच्या कारवर हल्ला झाल्याने खळबळ

कथित गोरक्षकांनी हल्ला केल्याचा आरोप

राजकीय वर्तुळातून पुन्हा एकदा धक्कादायक बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक करण्यात आल्याची घटना घडली होती. किर्तनकार संग्राम भंडारे यांच्यासह दहा ते पंधरा गोरक्षकांनी हल्ला केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला नेत्यावर मंगळवारी पहाटे हल्ला झाल्याची घटना उघडकीस आली आहे. धुळ्यातील राष्ट्रवादीच्या नेत्या रिता बाविस्कर यांच्या वाहनावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्या रिता बाविस्कर यांच्या वाहनावर धुळे तालुक्यातील वनी गावाजवळ गोरक्षकांनी पहाटेच्या तीन वाजेच्या सुमारास हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. बाविस्कर या आपल्या वाहनातून काही कामानिमित्त अमळनेर येथून धुळेमार्गे आपल्या वाहनातून जात होत्या. त्यावेळी धुळे तालुक्यातील वणी याठिकाणी कथित गोरक्षकांनी संबंधित वाहनात गोवंश जनावरे चोरून नेले जात असल्याच्या संशयावरून संबंधित वाहन रोखली. त्यानंतर लोखंडी खिळ्यांचा रॉड टाकून वाहन अडविण्याचा प्रयत्न केला.

NCP Leader Attack
Maharashtra News Live Update: विकास लवांडे आणि शरद पवारांची फोनवरून चर्चा

या घटनेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रीता बाविस्कर या थोडक्यात बचावल्या. या संदर्भात रिता बाविस्कर यांनी धुळे तालुका पोलीस ठाण्यात या कथित गोरक्षकांच्या विरोधात तक्रार दिली आहे. धुळे तालुका पोलिसांनी बाविस्कर यांच्या वाहनावर हल्ला करणाऱ्या तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करीत दोन जणांच्या मुसक्या देखील आवळल्या आहेत. तर एक जण अद्याप फरार असून त्याचा पुढील तपास धुळे तालुका पोलीस करीत आहेत.

NCP Leader Attack
Nashik Crime: खरातनंतर नाशिकमध्ये आणखी एका भोंदूचं कांड, विधी करण्याच्या नावाखाली महिलेला लॉजवर नेऊन बलात्कार

लवांडे यांच्यावर शाई फेकत धक्काबुक्की केल्याचा आरोप

शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर काही दिवसांपूर्वी शाइफेक करण्यात आली आहे. संग्राम भंडारे आणि दहा ते पंधरा गोरक्षकांनी शाईफेक केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पुण्यातील हवेली येथे प्रवचन संपल्यानंतर सकाळी दहा वाजता निघाले. त्यानंतर रस्त्यात भंडारे यांनी लवांडे यांना रोखलं. त्यानंतर त्यांच्या अंगावर शाईफेक केली. त्यानंतर शाईफेक करत धक्काबुक्की करून पिस्तुल दाखवल्याचाही आरोप विकास लवांडे यांनी केला. काही दिवसांपूर्वी लवंडे यांनी वारकरी सांप्रदायात प्रतिगामी घुसल्याचे म्हणत २० जणांची यादी जाहीर केली होती. या यादीवरूनच भंडारे यांनी शाईफेक केल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com