Maharashtra News Live Update: विकास लवांडे आणि शरद पवारांची फोनवरून चर्चा

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : सुवेंदू अधिकारी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होणार, तामिळनाडूत विजय यांचा शपथविदी, विदर्भासह राज्यात उष्णतेची लाट, काही ठिकाणी अवकाळी पाऊस, राजकीय घडामोडी यासह राज्यातील आणि देशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update
Maharashtra News Live UpdateSaam TV Marathi
Published On

pune : विकास लवांडे आणि शरद पवारांची फोनवरून चर्चा 

विकास लवांडे आणि शरद पवार यांची फोन वरून चर्चा

विकास लवांडे यांनी फोन वरून शरद पवारांना माहिती दिली

घडलेल्या घटनेबद्दल लवांडे यांनी शरद पवारांना कळवले

बनेश्वर क्षेत्रातील मधमाशांचा वाढता धुमाकूळ, भाविकांच्या जीवितास धोका

भोर तालुक्यातील नसरापूर येथील प्रसिद्ध बनेश्वर मंदिर परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून मधमाशांच्या हल्ल्यांचे प्रकार सातत्याने घडत असून, भाविक आणि पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बनेश्वर क्षेत्रातील वन विभागाच्या हद्दीत असलेल्या एका मोठ्या झाडावर तब्बल १५ ते १६ मोठी मधमाशांची पोळी असून, या मधमाशा दररोज मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांवर हल्ला करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

थलपती विजय उद्या 3.30 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार

भिवंडी शहरातील बाबला कंपाउंडमधील गिफ्ट युनिटला भीषण आग..

भिवंडी शहरातील बाबला कंपाउंड परिसरातील एका गिफ्ट तयार करणाऱ्या युनिटमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

स्थानिक तात्काळ आग विझवण्याचा प्रयत्न करत अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचले असून आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत

रायगड जिल्ह्यात वादळी पावसाने घेतला एक बळी

तळा तालुक्यात अंगावर वीज पडून एका लहान मुला मृत्यू

० कर्नाळा फळशेत गावातील घटना

० वेदांत भोसले वय वर्ष 14 असे मृताचे मुलाचे नाव

० अवकाळी पाऊस आल्यानं सामानाची आवराआवर करत असताना कोसळली वीज

पुणे बँगलोर महामार्गाला नदीचे स्वरूप

पुणे बँगलोर महामार्गाला कराड तालुक्यातील उंब्रज जवळ नदीचे स्वरूप आल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. साताऱ्यातील कराड व पाटण तालुक्याला आज पुन्हा अवकाळी पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे महामार्गाला अक्षरशः नदीचे स्वरूप प्राप्त झाल्याचे पाहायला मिळाले .

दिल्लीतील भाजप कार्यालयाला दहशतवादी हल्ल्याची धमकी

धर्माबाद तालुक्यातील माष्टी येथे दोन गटात हाणामारी

नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील माष्टी येथे दोन गटात हाणामारी झाली.या मारहाणीत लाठ्या काठ्याचा वापर करण्यात आला.या मारहाणीत सात ते आठ जण जखमी झाले असुन जखमी मध्ये तीन महिलांचा समावेश आहे. गावातील सार्वजनिक जागेच्या वादातून हाणामारी झाल्याची माहिती आहे.दरम्यान दोन्ही गटाच्या तक्रारी वरून कुंडलवाडी पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत.दोन्ही गटातील काही आरोपींना अटक करण्यात आली आहे.दरम्यान या घटने नंतर गावात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.हाणामारी प्रकरणाचा अधीक तपास सुरू आहे.

धाराशिवमध्ये संतप्त शेतकऱ्याने पेटवला कांदा

धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील तिंत्रज येथील कांदा उत्पादक शेतकरी भगवान साबळे यांनी अडीच एकरावरील 600 गोण्या कांद्याची काढणी केली होती. मात्र एक रुपया किलोचा भाव मिळत असल्याने संतप्त शेतकऱ्याने 600 गोण्या कांदा पेटवून दिलाय

निदा खानला आश्रय देणाऱ्या मतीन पटेल याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता त्याच्या घरावरही कारवाई होणार आहे

चंद्रपुरात पावसाच्या सरींनी नागरिकांना दिलासा

तीव्र उन्हाचे चटके सोसणाऱ्या चंद्रपूरकरांना आज आलेल्या पावसाच्या सरींनी दिलासा दिला. दुपारपासून इथे ढगाळ वातावरण होते. आणि आता पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. उन्हामुळे त्रस्त असलेल्या लोकांना यामुळे थोडा गारवा अनुभवता आला.

रत्नागिरीत पाऊस,  वादळी वा-यासह अवकाळी पावसाची हजेरी

  • रत्नागिरीत जोरदार अवकाळी पाऊस

  • वादळी वा-यासह अवकाळी पावसाची हजेरी

  • रत्नागिरीत अनेक ठिकाणी पावसाची हजेरी

  • अवकाळी पावसाचा हवामान विभागानं वर्तवला होता अंदाज

  • अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदार धास्तावले

वर्धा जिल्ह्यातील वातावरणामध्ये बदल, ढगाळ वातावरणामुळे तापमानात काहीशी घट

- ढगाळ वातावरणामुळे तापमानात काहीशी घट

- पावसाच्या शक्यतेने तिळ उत्पादक शेतकऱ्यांमध्ये काळजी

- काही शेतात जोरदार हवेमुळे तिळ जमिनीवर पडल्याने काही प्रमाणात नुकसानीची शक्यता

- अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामात तिळाची लागवड केली

- तिळाच पिक काढणीला येत असताना बदलत्या वातावरणाने शेतकऱ्यांमध्ये काळजी

धुळे जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा परिणाम उन्हाळी भुईमूग काढणाऱ्या मजुरांवर

धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा हा 42 अंशांच्या पुढे जाऊन पोहोचला असून, या वाढत्या तापमानामुळे उन्हाळी भुईमूग काढणाऱ्या शेत मजुरांना मात्र मोठा त्रास सोसावा लागत आहे.

शेतात बसून भुईमूगाच्या शेंगा काढणाऱ्या शेतमजुरांना अक्षरशः झाडांच्या सावलीचा आधार घेत भुईमुगाच्या शेंगा काढण्याची वेळ आली आहे

अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

अशोक खरातला शिर्डीतील जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

पिंपरी-चिंचवड मेट्रोच्या कामाचा निष्काळजीपणा, मेट्रो ब्रीजवरील पत्रा पडल्याने नागरिकांचा जीव थोडक्यात बचावला

पिंपरी चिंचवड शहरात मेट्रोचा कामाचा पुन्हा एकदा निष्काळजीपणा समोर आला आहे. भक्ती शक्ती चौकात मेट्रोचे काम सुरू असताना मेट्रो ब्रिजवरील लोखंडी मोठा पत्रा खाली पडल्याने रस्त्याने जाणारे एका व्यक्तीचा जीव थोडक्यात बचावला आहे. मात्र या घटनेमुळे मेट्रोच्या कामाचं निष्काळजीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे.

पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट

पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिलेला असून पुढील 3 ते 4 तासांत पुणे जिल्ह्यांत काही भागात वीज पडण्याची शक्यता आहे.

तुमच्या परिसरात वीज पडण्याची शक्यता आहे, सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या, उंच ठिकाणी, मोकळ्या जागांवर जाणे टाळा, झाडांखाली उभे राहू नका, प्रवास टाळा. एसईओसी मंत्रालय वरील माहिती सचेत अँप वरून घेतलेली आहे.

यवतमाळमध्ये वडकीत 58 जनावरांची सुटका, तिघांना अटक

तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी जात असलेल्या 58 गोवंशाची यवतमाळच्या वडकी पोलिसांनी सुटका करित तीन आरोपींना अटक केलीये.

या कारवाईत तब्बल 41 लाख 60 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून नागपूर येथील तिघांना पोलिसांनी अटक केलीये.

मुंबई गोवा महामार्गांवर बसचा अपघात

मुंबई गोवा महामार्गांवर डम्पर आणि खाजगी बसला अपघात झाला आहे. अपघातात चार प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. माणगावजवळ विघवली गावाच्या हद्दीत हा अपघात झाला आहे. जखमींना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवले. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या डम्परला बसने मागून धडक दिल्याने हा अपघात झाला आहे.

महाडला अवकाळी पावस आणि जोरदार पावसाने झोडपले 

आज पुन्हा महाड तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. जोरदारा वादळी वारी आणि पावसाच्या सरींनी महाडकरांना चांगलच झोडपुन काढले. 15 ते 20 मिनिट पाऊस आणि वादळी वाऱ्याचा अनुभव महाडकांनी घेतला. सकाळ पासून असह्य गर्मीचा त्रास होत असताना पावसानंतर वातावरणात गारवा निर्माण झाला.

शिर्डी पोलिस भोंदू अशोक खरातला घेऊन न्यायालयाकडे रवाना 

शिर्डी पोलिस भोंदू अशोक खरातला घेऊन न्यायालयाकडे रवाना

पाच दिवसांची पोलीस कोठडी आज संपली

भोंदू खरातला राहाता कोर्टात करणार हजर

खरातवर शिर्डीतील शेतकऱ्याची जमीन व्यवहारात फसवणूक आणि सावकारीचा दाखल आहे गुन्हा

छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक पोलीस आयुक्तांच्या भेटीला

शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक पोलीस आयुक्तांच्या भेटीला गेल्याची माहिती समोर आली आहे. निदा खान प्रकरणात पोलीस आयुक्तांना दिले निवेदन आहे. कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात निदा खानला मदत करणाऱ्या मतीन पटेल या नगरसेवकावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्यासह शिवसेनेचे नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते. “एमआयएम पक्ष कुठेतरी धर्मांतराला समर्थन करत आहे,” अशी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांची प्रतिक्रिया आहे.

जळगावच्या चाळीसगाव शहरात मध्यरात्री अज्ञात जमावाकडून दगडफेक 

जळगावच्या चाळीसगाव शहरातील मैतर कॉलनी परिसरात मध्यरात्री अज्ञात जमावाकडून दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. या दगडफेकीमध्ये अनेक नागरिकांच्या घरांचे तसेच वाहनांचे नुकसान झाले आहे. मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास ही दगडफेकीची घटना घडली आहे. अज्ञात जमावाने राजकीय पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयाला लक्ष्य करत दगडफेक केली असल्याची माहिती समोर आली आहे.

Accident News : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात

मुंबई-गोवा महामार्गावर नांदगाव ओटव फाटा येथे चाकरमान्यांच्या कारचा भीषण अपघात झाला.

दोघे गंभीर जखमी, एकाचा मृत्यू

खेड तालुक्यात पावसाची हजेरी; उकाड्यातून दिलासा

खेड तालुक्यात प्रचंड उकाड्यानंतर आज अचानक पावसाने हजेरी लावली.

त्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला

उन्हाळी पिकांच्या नुकसानीची भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.

विकास लवांडे यांच्यावर काळी शाई फेकून वारकरी संप्रदायाचा जाहीर निषेध

विकास लवांडे यांच्यावर काळी शाई फेकून वारकरी संप्रदायाचा जाहीर निषेध

संग्राम बापू भंडारे यांचा सडेतोड इशारा

विकास लवंडेंवर शाईफेक करणाऱ्यांवर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

विकास लवांडे शाई फेक प्रकरण

अक्षय कांचन, संग्राम भंडारे यांच्यासह इतर व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल

पुण्यातील लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

शस्त्र कायदा अन्वये तसेच इतर बी एन एस कायद्याच्या अन्वये गुन्हा दाखल

Akola : अकोला जिल्ह्यात दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

अकोला जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्याची आत्महत्या

दहावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांने उचललं टोकाचं पाऊल

'विठ्ठल संतोष बोर्डे'(Vitthal Borde) असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव

Sangram Bhandare : संग्राम भंडारेला अटक करण्याची विकास लवांडे यांची मागणी

संग्राम भंडारेला अटक करण्याची विकास लवांडे (vikas lawande) यांची मागणी

लोणी काळभोर मध्ये विकास लवांडे यांचा ठिय्या

अटक होत नाही तोपर्यंत जाणार नाही, लवांडे यांची प्रतिक्रिया

मी पोलिसांकडे तक्रार केली आहे, एफ आय आर अजून हातात आली नाही

Gadchiroli : तेंदूपत्ता तोडणीदरम्यान रानडुकरांचा हल्ला; महिला गंभीर

गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली आहे.

बोडेना जंगल परिसरात तेंदूपत्ता तोडणीसाठी गेलेल्या मजुरांवर रानडुकरांनी अचानक हल्ला केला.

या हल्ल्यात एका महिलेसह तिघेजण जखमी झाले असून, महिलेला गंभीर दुखापत झाली आहे.

पिंपरी चिंचवड शहरात सोसायटीमध्ये PNG गॅस लिक, दोनशे रहिवासी थोडक्यात बचावले

पिंपरी चिंचवड शहरातील चऱ्होली परिसरामध्ये एक अतिशय धक्कादाय घटना घडली आहे. चऱ्होली परिसरातील अटलांटिका सोसायटीमध्ये काल मध्यरात्री मोठ्या प्रमाणात पीएनजी गॅसची गळती झाली होती. पीएनजी गॅस गळतीमुळे अटलांटिका सोसायटीमध्ये राहणारे जवळपास 200 कुटुंबांचं जीव धोक्यात आलं होतं मात्र या घटनेची वर्दी मिळताच , पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून पीएनजी गॅस गळती थांबवली

Mumbai-Goa Highway: मुंबई गोवा महामार्गावर माणगाव येथे मोठी वाहतूक कोंडी

मुंबई गोवा महामार्गावर माणगाव इंदापूर माणगाव येथे मोठी वाहतूक कोंडी

कोकणात जाणाऱ्या मार्गावर जवळपास सहा किलोमीटर पर्यत वाहनांच्या लांबच लांब रागा

इंदापुर ते रुद्रवली फाट्या पर्यत वाहनांच्या रांगा

माणगांव बाजारपेठ ते खरवली फाट्या पर्यत वाहतूक कोंडी

शनिवार रविवार सुट्टी असल्याने कोकणात निघालेले पर्यटक वाहतूक कोंडीत आडकले

महामार्गावर वाहनांच्या संख्येत मोठी वाढ

 Nandurbar: नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा कहर, पारा ४२ अंशावर

नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा कहर...

तापमानाचा पारा 42 अंश सेल्सिअस वर....

सातपुड्यात अवकाळी पाऊस तर शहरी भागात उन्हाचे चटके....

नंदुरबार जिल्ह्यात सातत्याने वातावरणात बदल...

तापमानाचा पारा वाढल्याने रस्ते निर्मनुष्य....

पुढील काही दिवसात तापमानात आणखीन वाढ होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज..

पीएम मोदी पश्चिम बंगालमध्ये शपथविधीसाठी दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये दाखल झाले आहेत

सुवेंदू अधिकारी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार

शपथविधीसाठी पीएम मोदी, अमित शाह उपस्थित

Dharashiv: दहावीला कमी गुण मिळाले म्हणून विद्यार्थ्याची आत्महत्या

धाराशिव च्या भूम मध्ये दहावीला कमी गुण मिळाल्यामुळे विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आदित्य नितीन जाधव तो भूम येथील रवींद्र हायस्कूल मध्ये शिक्षण घेत होता.काल दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आदित्य घरी परतला. त्याला सुमारे ६३.६० टक्के गुण मिळाले होते. अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने तो मानसिक तणावात होता.घरात कोणी नसताना आदित्यने राहत्या घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली.

Navapur: नवापूर मध्ये पुन्हा तीन पोल्ट्री फार्मचे नमुने आले पॉझिटिव्ह....

नवापूर मध्ये पुन्हा तीन पोल्ट्री फार्मचे नमुने आले पॉझिटिव्ह....

नव्याने तीन पोल्ट्री फार्मचे नमुने पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाची चिंता वाढली....

नमुने पॉझिटिव्ह वाल्याने दुसऱ्या टप्प्यातील कलिंग ऑपरेशनला सुरुवात...

पालावाला पोल्ट्री फार्म सकिस्मा पोल्ट्री फार्म अश्रफ पोल्ट्री फार्म अशा तिघ पोल्ट्री फार्मचे पॉझिटिव्ह वाल्याने पुन्हा खळबळ....

गेल्या आठ दिवसांत तब्बल 10 लाख 67 हजार अंडी आणि 1 लाख 74 हजार किलो पशुखाद्य नष्ट....

आतापर्यंत एकूण 1 लाख 23 हजारहून अधिक पक्षांचे कलिंग पूर्ण...

40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान असूनही पशुसंवर्धन विभागाचे कर्मचारी पीपीई किट घालून करताय काम...

Pandharpur: पंढरपुरात दर्शन मंडप स्कायवॉक कामाला सुरवात

पंढरपुरात काॅरिडारला शिखर समितीची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर मंदिर समितीच्या कामांना वेग आला आहे. मंदिर समितीच्या दर्शन मंडप आणि स्कायवॉक उभारणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. येत्या सोमवारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे.

229 कोटी रूपये खर्च करून तीन मजली दर्शन मंडप आणि स्काय वॉक उभारला जाणार आहे. यामध्ये भाविकांसाठी विश्रांती कक्ष,बैठक ,हाॅल,दर्शन रांग,शौचालय आदी सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सुवेंदू अधिकारी यांचे अभिनंदन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा करिष्मा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची चाणक्य नीति पश्चिम बंगालमध्ये यशस्वी ठरली असून जनतेने विकास, विश्वास आणि राष्ट्रहिताच्या भूमिकेला कौल दिला आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. पश्चिम बंगालमधील विजय हा कार्यकर्त्यांच्या अथक मेहनतीचा आणि एनडीएच्या प्रभावी रणनीतीचा परिणाम असल्याचेही शिंदे यांनी म्हटले आहे.

Maharashtra Politics: राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाही फेक

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाही फेक

संग्राम भंडारे आणि दहा ते पंधरा गोरक्षकांनी शाही फेक केले असल्याचा विकास लवांडे यांचा आरोप

हवेली येथे प्रवचन संपल्यानंतर सकाळी दहा वाजता ची घटना

अंगावर शाही फेकत धक्काबुक्की करून पिस्तूल दाखवला असल्याचा विकास लवांडे यांचा आरोप

बिग्रेड परेड ग्राउंडवर पोहचले पीएम मोदी; थोड्याच वेळात सुवेंदू अधिकारी यांचा शपथविधी होणार

सुवेंदू अधिकारी आज बंगालच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार

पीएम मोदी शपथविधीसाठी उपस्थित

बिग्रेड परेड ग्राउंडवर होणार शपथविधी

युरियाच्या काळाबाजार करणाऱ्या खताच्या दुकानांना कृषी विभागाचा दणका

युरियाच्या काळाबाजार करणाऱ्या खताच्या दुकानांना कृषी विभागाचा दणका मोठी कारवाई

786 केंद्राचे परवाने निलंबित तर 55 परवाने कायमचे रद्द कृषी विभागाची राज्यभरात कारवाई

युद्धजन्य परिस्थितीमुळे खताच्या राज्यात काळाबाजार आणि साठेबाजी करणाऱ्या कृषी केंद्र विरुद्ध कृषी विभागांची कारवाई

कृत्रिम खताची टंचाई करण्यात येत असल्याच्या तक्रारीनंतर दहा हजार केंद्राची तपासणी करण्यात येणार आहे

या मोहिमेत १२ ठिकाणी गुन्हे दाखल आहेत

Pune : लोणावळ्यात स्कायवॉक प्रकल्पसाठी रस्ता रुंदीकरण करत असताना जुनी झाडे संरक्षित करा 

सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या लोणावळा या पर्यटन नगरीला निसर्गाने भरभरून सौंदर्य बहाल केले आहे. सध्या येथील स्कायवॉक प्रकल्पांतर्गत कुमार चौक ते टायगर पॉईंट दरम्यान सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे काम नियोजित आहे. मात्र, या प्रकल्पासाठी लोणावळ्याचे नंदनवन मानल्या जाणाऱ्या 'रायवूड' भागातील शेकडो वर्षांची जुनी झाडे तोडण्याचा मानस प्रशासनाने आखला आहे. या निर्णयामुळे स्थानिक पर्यावरणप्रेमी जागृत झाले असून, त्यांनी याला कडाडून विरोध दर्शवला आहे. नागरिकांचा विरोध स्कायवॉक प्रकल्पाला नसून, त्या नावाखाली होणाऱ्या वृक्षतोडीला आहे.

Maharashtra News Live Update: सूवेंदू अधिकारी ११ वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार

पश्चिम बंगाल मुख्यमंत्री शपथविधी सोहळा थोड्याचवेळात सुरू होणार आहे. सुवेंदू अधिकारी आज सकाळी ११ वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. अमित शाह, राजनाथ सिंह यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री कोलकाता येथे पोहोचले आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंगालच्या मुख्यमंत्रीपदी सुवेंदु अधिकारी यांची निवड झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन केले. उपमुख्यमंत्री शिंदे हे आज सुवेंदु अधिकारी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी कोलकता येथे उपस्थित राहणार आहेत.

बदलापुरात नेपाळी इसमाचा मारहाणीनंतर मृत्यू

बदलापुरात एका नेपाळी इसमाचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातून धामणगाव रेल्वे तालुक्यातील ग्रामपंचायत अशोक नगरला डावलल्याचा आरोप

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामध्ये अमरावती जिल्हातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील ग्रामपंचायत अशोक नगरला जाणीवपूर्वक पुरस्कारापासून वंचित ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ग्रामविकास अधिकारी आणि संगणक परिचालक यांनी संगनमत करून ऑनलाईन फॉर्मेट भरताना ग्रामपंचायतीची माहिती चुकीची अपलोड केली. त्यामुळे पात्र असूनही गाव अपात्र ठरल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही अशोक नगर ग्रामपंचायतीला अनेक पुरस्कार प्राप्त झालेले असताना यंदा अपात्र का ठरविण्यात आले, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.

वाढत्या चोरीच्या घटनांमुळे हातात काठ्या घेऊन ग्रामस्थ घालताय रात्रीची गस्त

अहिल्यानगर जिह्यातील लोणी, सोनगाव, सात्रळ आणि धानोरे या गावांमध्ये वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.. गेल्या दोन आठवड्यांपासून सतत होत असलेल्या चोऱ्यांमुळे ग्रामस्थ आता स्वतःच हातात काठ्या घेऊन रात्रीची गस्त घालत आहेत.. पंचक्रोशीत चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून सततच्या चोरीच्या घटनांमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.. युवकांनी रात्री गाव सुरक्षा पथके तयार केली असून, भितीपोटी रात्रभर जागे रहाण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.. पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.

गद्दारीच काम कोणी करू नका, तुम्हाला तुमचा मार्ग मोकळा आहे -विकास गोगावले यांनी शिवसैनिकांचे कान पिळले

बिरवाडी येथील सभेत शिवसेना कोअर कमिटी सदस्य विकास गोगावले यांनी संघटनेशी गद्दारी करणाऱ्या शिवसैनिकांचे कांन पिळले आहेत. मला सगळ्या बातम्या असतात, आम्हाला काही समजत नाही अस समजू नका अस सांगताना उगचच आम्हाला आमच्या रुद्र आवतारात यायला लावू नका असा इशारा विकास गोगावले यांनी गद्दारी करणाऱ्यांना दिला आहे. गद्दारीच काम कोणी करू नका, तुम्हाला तुमचा मार्ग मोकळा आहे असा बाहेरचा रस्ता दाखवणारा टोका सल्ला देखील विकास गोगावले यांनी संघटनेशी गद्दारी करणाऱ्यांना दिला आहे. संघटनेवर कोण रोष काढत असेलतर खपवून घेणार नाही असा आक्रमक इशारा देखील गोगावले यांनी दिला आहे.

दुचाकीच्या धडकेत इसमाचा मृत्यू. राष्ट्रीय महामार्ग 53 वरील घटना

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर आज सकाळी 6:30 वाजता एक दुर्दैवी घटना घडली. खामगाव ते नांदुरा दरम्यान असलेल्या कोलासर फाट्याजवळ दुचाकीचा धक्का लागून पंढरी त्र्यंबक बगाडे या इसमाचा जागीच मृत्यू झाला. पंढरी बगाडे यांच्या मुलाचं आज लग्न होतं तर उद्या मुलीचे लग्न आहे. पंढरी बगाडे यांच्या दुर्दैवी मृत्यूने मुलाच्या आणि मुलीच्या लग्नावर विघ्न कोसळलं आहे.

बुलढाणा पोलिसांचा बुलेट वाल्यांना दणका.. कर्णकर्कश सायलेन्सर गाड्या जप्त

कर्णकरकश्य आवाजात फटाके फोडत दुसऱ्यांच्या हृदयाला हादरविणाऱ्या बुलेट स्वरांना चांगला दणका बुलढाणा पोलिसांनी दिला आहे.. झालेल्या कारवाईत मॉडीफाय सायलेन्सर बसविलेल्या 25 बुलेट धारकांवर कारवाई करत जिल्ह्यात एकच खळबळ उडून दिली आहे.. तर आरटीओ निरीक्षकांनी केलेल्या तपासणीत नियमाचे उल्लंघन केल्याचे आढळल्याने त्यांना दंड देखील ठरवण्यात आला.. बुलढाणा शहरच नव्हे तर जिल्हाभर शान की सवारी म्हणून बुलेट वापरणाऱ्यांनी सामान्य लोकांचा वैताग वाढवल्याचे दिसत आहे . यामुळे हा एक प्रकारे बुलेट वाल्यांना चांगला दणका दिल्याचे बोलल्या जात आहे..

वाशिम जिल्ह्यात अनेक भागात अवकाळी पाऊस बरसला.

वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी रात्री ते सकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला आहे, जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी ही अवकाळी पावसाचे आगमन झाल्याने उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरीकांना दिलासा मिळालाय.

महाडमध्ये राष्ट्रवादीला शिवसेनेने दिला मोठा धक्का

महाड तालुक्यातील प्रतिष्ठेची असलेल्या खरवली काळीज ग्राम पंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. खरवली काळीज ग्राम पंचायतीचे सरपंच चैतन्य म्हामुणकर यांनी आपल्या असंख्य राष्ट्रवादी कार्यकर्त्यांसोबत शिवसेनेत प्रवेश केला आहे. रायगड जिल्हा परिषद सदस्य विकास गोगावले यांनी म्हामुणकर यांच्या हातात भगवा झेंडा देत त्यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांच शिवसेनेत स्वागत केल. श्रीवर्धन, म्हसळा, दिवेआगार येथे एकामागोमाग एक मोठे धक्के शिवसेनेने राष्ट्रवादीला दिले आहेत, काळजी खरवली ग्राम पंचायत राष्ट्रवादीच्या हातुन जाण हा असाच मोठा धक्का मानला जात आहे.

Maharashtra News Live Update: बोरामणी तिहेरी हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपीला बांगलादेश सीमेवर सोलापूर पोलिसांनी पकडलं

बोरामणी तिहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपी मयत गायत्री यांचा दीर शंकर दत्तात्रय मस्के ऊर्फ पप्पू याला महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बांगलादेश सीमेवरून अटक केलीय.

Maharashtra News Live Update: सोलापुरातील ट्रान्सफॉर्मरला भीषण आग

- सोलापुरातील पटवर्धन चौक येथील ट्रान्सफॉर्मरला अचानक आग लागली..

- सह्याद्री शॉपिंग सेंटर येथील विद्युत मंडळाच्या डीपीला स्पार्किंग झाल्यामुळे आग लागल्याची माहिती

- स्पर्किंगमुळे आग लागल्यानंतर आगीचे रौद्र स्वरूप पाहायला मिळाले

- दरम्यान अग्निशामन दलाच्या एका पंपाने ही आग विझवण्यात आली आहे.

Maharashtra News Live Update: सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा; सूवेंदू होणार बंगालचे अधिकारी, तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री

तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये आज मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी होणार आहे. बंगालमध्ये भाजपचे सुवेंदू अधिकारी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. तर तामिळनाडूमध्ये थलापती विजय यांनी सत्तास्थापनेच्या आकड्याचे गणित जुळवले असून आज ते मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. सकाळी ११ वाजता शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com