काँग्रेसचे टेन्शन वाढलं, आमदार नितीन राऊत नाराज; थेट दिला पक्ष सोडण्याचा इशारा

nitin raut News : नितीन राऊत यांच्या राजीनामाच्या इशाऱ्याने काँग्रेसचे टेन्शन वाढलं. त्यांनी थेट पक्ष सोडण्याचा इशारा दिला आहे.
Congress News
Congress newsSaam tv
Published On
Summary

नागपुरात राजकीय हालचालींना वेग

माजी मंत्री नितीन राऊत नाराज

नितीन राऊत यांनी दिला पक्ष सोडण्याचा इशारा

नागपूर महापालिकेतील स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून माजी मंत्री नितीन राऊत यांनी विकास ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर बोट ठेवलं आहे. एकीकडे दोन्ही प्रदेशाध्यक्षांनी दोन्ही नेत्यांचा एकेक स्वीकृत सद्यस्य घ्यायच्या सूचना दिल्यात. तरीही विकास ठाकरेंनी मनाप्रमाणे दोन्ही स्वीकृत सदस्य मनाप्रमाणे केल्याचा आरोप राऊत यांनी केला. पक्षात अपमान होत असेल तर मला आणि माझ्या नगरसेवकांना भूमिका घ्यावी लागेल. तसेच मी पक्ष देखील सोडेल, असा इशारा नितीन राऊत यांनी दिला आहे.

स्वीकृत सदस्यपदसाठी राऊतांनी सुरेश जग्यासी यांचं नाव समोर केलं होतं. परंतु पराभूत उमेदवाराला स्वीकृतपदी नियुक्ती नको, असं पत्र काँग्रेसने काढलं. त्यामुळे नितीन राऊत यांनी बंडोपंत टेभुर्णे यांचं नाव समोर केलं. मात्र, त्यांनी नाव समोर केलेल्या टेभुर्णे यांना स्वीकृत पद मिळालं नाही. त्यामुळे राऊत नाराज झाल्याची माहिती समोर आली आहे.

एका वृत्तसंस्थेशी बोलताना नितीन राऊत म्हणाले, 'आम्ही दोघे आमदार आहोत. प्रदेशाध्यक्षांनी भूमिका घेतली. दोन्ही आमदारांना एकेक सदस्य द्यायचा. संख्याबळ हे पक्षाचे आहे. स्वीकृत सदस्य नियुक्तीचे परिपत्रक निघालं, मला कळवण्यात आलं नाही'.

'नियुक्तीविषयी बुधवारी सकाळी कळले. मी प्रदेश प्रभारी रमेश चेन्नाथला यांच्या संवाद साधला. त्यांनाही टेंभुर्णे यांचं नाव पाठवलं आहे. टेंभुर्णे हे सर्व कागदपत्रे घेऊन तयार होते. त्यांना दिवसभर फिरवलं. परंतु शेवटच्या दोन मिनिटांपूर्वी टेंभुर्णे यांना आयुक्तांपुढे नेण्यात आलं. त्याआधीच इटनकरांनी काँग्रेसकडून आधीच दोन अर्ज झाल्याचे सांगितले होते, असं म्हणत आमचा 'प्री-प्लान' घात केल्याचा आरोप राऊत यांनी केला.

Congress News
मोठी बातमी! भाजप आमदाराला 'पीएमओ'चा दणका; थेट पीएम मोदींनीच दिले कारवाईचे आदेश, काय आहे प्रकरण?

तत्पूर्वी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत यांनी नागपूर महानगरपालिकेत स्वीकृत सदस्य निवड प्रक्रियेत डावलल्याचा आरोप केला. या पार्श्वभूमीवर संबंधित प्रक्रियेबाबत मनपा विरोधी पक्षनेते यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. स्वीकृत सदस्य पदासाठी अर्ज भरण्याचा काल शेवटचा दिवस होता. अनेक नगरसेवकांनी मागणीच्या आधारे अर्ज दाखल केले.

Congress News
Maharashtra News Live Update: कल्याणमधील कमलादेवी कॉलेजच्या विरोधात आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आंदोलन

प्रदेश काँग्रेस कमिटीकडून निवडणुकीत पराभूत झालेल्यांना स्वीकृत सदस्य पद देऊ नये, असे निर्देश देण्यात आले होते. परंतु नगरसेवकांनी मागणी केलेल्या नावाच्या व्यक्तींना उमेदवारी अर्ज देण्यात आल्याचं मनपा विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांनी स्पष्ट केले आहे. तर उमेदवारी अर्ज दाखल केलेले आमदार विकास ठाकरे यांचे पुत्र केतन ठाकरे यांनीही उमटलेल्या नाराजीनंतर मला स्वीकृत पद नको असल्याचे पत्र विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांना दिले. याबाबत अंतिम निर्णय शहर काँग्रेस कमिटी घेणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com