Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचं पुन्हा ऑपरेशन टायगर, ठाकरे गटाचे 14 आमदार फुटणार?

Operation Tiger Latest Update Bharat Gogawale Statement: उद्धव ठाकरे गटाला पुन्हा धक्का बसणार का? ६ खासदारांनंतर ठाकरे गटाचे १४ आमदार शिंदेसेनेत जाण्याची चर्चा सुरू असताना मंत्री भरत गोगावले यांनी ऑपरेशन टायगर लवकरच यशस्वी होणार असल्याचे सूचक विधान केले आहे.
Operation Tiger latest update Bharat Gogawale statement
Operation Tiger latest update Bharat Gogawale statementsaam tv
Published On

भरत नागणे, साम टीव्ही

पंढरपूर: उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा जोरदार धक्का देण्याची जोरदार तयारी शिंदेसेनेत सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे. आणि त्याला कारण ठरलयं शिंदेसेनेनं दिलेले ऑपरेशन टायगरचे संकेत. 6 खासदारांच्या फुटीनंतर आता ठाकरेसेनेतील 14 आमदार फुटणार असल्याची चर्चा रंगली आहे. हे सर्व आमदार ऑपरेशन टायगर अंतर्गत शिंदेसेनेत पक्षप्रवेश करतील, अशी चर्चा आहे. अशातच मंत्री भरत गोगावले यांनी सांगोला येथे आयोजित शिवसेना मेळाव्यात मोठे विधान केले आहे.

Operation Tiger latest update Bharat Gogawale statement
Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना आणखी धक्के बसणार? 6 नगरसेवक सोडणार ठाकरेंची साथ, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

शिंदेसेनेनं कोकण मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील 3 मंत्र्यांवर ऑपरेशन टायगरची जबाबदारी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, ठाकरेसेनेचा एकही आमदार फुटणार नसल्याचा विश्वास ठाकरेसेनेच्या काही आमदारांनी व्यक्त केलाय. तर दुसरीकडे ऑपरेशन टायगर सांगून होत नसते. ते होईल तेव्हा ब्रेकिंग न्यूज मिळेल असं सांगत मंत्री उदय सामंतांनी ऑपरेशन टायगरचे संकेत काही दिवसांवपूर्वी दिले होते.

Operation Tiger latest update Bharat Gogawale statement
Operation Tiger: मोठी बातमी! नवरात्रीआधी ठाकरेंचे १४ आमदार फुटणार, शिंदेसेनेत प्रवेश करणार?

उद्धव ठाकरे गटाचे सहा खासदार शिंदेसेनेत दाखल झाल्यानंतर आता लवकरच ‘ऑपरेशन टायगर’ मोहीम यशस्वी केली जाणार असल्याचा मोठा दावा रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी केला आहे. उद्धव ठाकरे गटाचे आणखी 14 आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच गोगावले यांच्या या वक्तव्यामुळे चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.

Operation Tiger latest update Bharat Gogawale statement
Maharashtra Politics: आमदार-नगरसेवक वाचवण्यासाठी धावाधाव; ठाकरे सेनेकडून डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न

भरत गोगावले आज सांगोला येथे आयोजित शिवसेना मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी ‘ऑपरेशन टायगर’बाबत सूचक वक्तव्य करत हे ऑपरेशन लवकरच यशस्वी होणार असल्याचे म्हटले. उद्धव ठाकरे गटाचे काही खासदार शिंदेसेनेत दाखल झाल्यानंतर आता ठाकरे गटातील आमदारही शिंदेसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू आहेत. विशेषतः 14 आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याची राजकीय चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर भरत गोगावले यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ‘ऑपरेशन टायगर’ नेमके किती मोठे असणार आणि ठाकरे गटातील आणखी कोणते नेते शिंदेसेनेत प्रवेश करणार, याबाबत राजकीय तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे. तर हे 14 आमदार नेमके कोण आहेत? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com