Maharashtra Politics: रायगडमध्ये मोठा राजकीय भूकंप! तटकरेंनी ठाकरेंचा जवळचा नेता फोडला, पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादीत जाहीर पक्षप्रवेश

Raigad Political News: रायगडमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे. सुनील तटकरे यांनी उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला. ठाकरेसेनेच्या बड्या नेत्याने पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला.
Maharashtra Politics: रायगडमध्ये मोठा राजकीय भूकंप! तटकरेंनी ठाकरेंचा जवळचा नेता फोडला, पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादीत जाहीर पक्षप्रवेश
Raigad Political NewsSaam Tv
Published On
  • रायगडमध्ये उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला

  • सुनील तटकरेंनी उद्धव ठाकरेंचा जवळचा नेता फोडला

  • ठाकरेंचे नेते सोमनाथ ओझर्डे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला

  • सोमनाथ ओझर्डे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत एन्ट्री केली

  • या पक्षप्रवेशामुळे रायगडमधील राजकीय समिकरण बदलले

सचिन कदम, रायगड

रायगडमध्ये मोठा राजकीय भूकंप आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला. तटकरेंनी उद्धव ठाकरेंचा जवळचा नेता फोडला. ठाकरे गटाचे महाड विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक सोमनाथ ओझर्डे यांनी राष्ट्रवादीत जाहीर पक्षप्रवेश केला. या पक्षप्रवेशानंतर सुनील तटकरे यांचा भरत गोगावलेंच्या मतदारसंघावर डोळा असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. या पक्षप्रवेशामुळे रायगडमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे.

रायगडमध्ये सुनिल तटकरे यांनी एका दगडात पुन्हा एकदा दोन पक्षी मारले आहे. ठाकरे गटाचे समन्वयक सोमनाथ ओझर्डे यांना आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश देत सुनील तटकरे यांनी मंत्री भरत गोगावले यांना शह देण्याची रणनीती आखली आहे. सोमनाथ ओझर्डे यांनी आज शिवसेना पदाधिकारी आणि सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे रायगडमधील राजकीय समिकरणं बदलली आहेत.

Maharashtra Politics: रायगडमध्ये मोठा राजकीय भूकंप! तटकरेंनी ठाकरेंचा जवळचा नेता फोडला, पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादीत जाहीर पक्षप्रवेश
Politics : राजकारणात मोठी उलथापालथ! माजी मुख्यमंत्र्यांच्या निष्ठावान नेत्यानं साथ सोडली; भाजपने डाव टाकला

सुनील तटकरे यांनी सोमनाथ ओझर्डे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे पक्षात स्वागत केलं. कर्जतमध्ये शिंदेसेनेचे आमदार महेंद्र थोरवे विरूद्ध राष्ट्रवादीचे सुधाकर घारे हा वाद सुरु असताना आता महाडमध्ये गोगावले विरुद्ध राष्ट्रवादीचे सोमनाथ ओझर्डे हा वाद सुरु होणार का? अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

Maharashtra Politics: रायगडमध्ये मोठा राजकीय भूकंप! तटकरेंनी ठाकरेंचा जवळचा नेता फोडला, पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादीत जाहीर पक्षप्रवेश
Punjab Politics: भाजप आणि शिरोमणी अकाली दलाची युती होणार की तुटणार? दोन्ही पक्षातील नेमका तिढा काय?

दरम्यान, भरत गोगावले यांच्या महाडमधील साम्राज्याला सुरुंग लावण्याची सुनील तटकरे यांनी तयारी केली असल्याची देखील चर्चा सुरू झाली आहे. कारण ठाकरे गटाच्या सोमनाथ ओझर्डे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचे वेळी त्यांनी महाडमध्ये मेळाव्याची घोषणा केली. नवरात्रीनंतर महाडमध्ये भव्य मेळावा होणार आहे. महाडमधील या मेळाव्याची सुनील तटकरेंकडून घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे नवरात्रीपर्यंत रायगडमध्ये आणखी मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Maharashtra Politics: रायगडमध्ये मोठा राजकीय भूकंप! तटकरेंनी ठाकरेंचा जवळचा नेता फोडला, पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादीत जाहीर पक्षप्रवेश
Maharashtra Politics: २ बड्या नेत्यांसह ४० जणांविरोधात गुन्हे, राजकीय वर्तुळात खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com