NDA प्रवेशासाठी दिल्लीत भेटीगाठी? अमित शाहांनंतर सुनील तटकरे मोदींना भेटले

Sunil Tatkare Meets PM Modi : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेत. सुनील तटकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली.
Sunil Tatkare Meets PM Modi
NDA Entry Buzz: Sunil Tatkare Meets Pm Modi After Amit Shah Meeting
Published On
Summary
  • अमित शाहांनंतर सुनील तटकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्याची माहिती.

  • राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या दिल्लीतील भेटीगाठींमुळे राजकीय चर्चांना उधाण.

  • पवारांच्या राष्ट्रवादीतील नेतेही भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या संपर्कात असल्याचा दावा.

अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांपाठोपाठ आता पंतप्रधान नरेंद्र मोंदीची भेट घेतलीय. पवारांच्या राष्ट्रवादीतील नेतेही सातत्यानं भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाशी भेटीगाठी करतायत. त्यामुळे पवारांच्या NDA प्रवेशासाठी दिल्लीत भेटीगाठीची सत्र सुरु आहेत का? पाहूयात या रिपोर्टमधून.

Sunil Tatkare Meets PM Modi
PM Modi Death Threat: पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी; जगभरात खळबळ, तपास यंत्रणा सतर्क

दिल्लीच्या राजकारणात नक्की चाललंय काय? असा प्रश्न पडेल अशी मोठी घडामोड समोर आलीय.दादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीपाठोपाठ आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलीय. त्याशिवाय शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांनीही NDA सरकारमधील वरिष्ठ नेत्यांची भेट घेतलीय. त्यामुळे पवारांची राष्ट्रवादी NDAसोबत जाणार का? असा सवाल वारंवार उपस्थित होतोय. NDA प्रवेशासाठी दिल्लीत महत्त्वाच्या भेटीगाठी कसा सुरु आहेत. पाहूयात.

Sunil Tatkare Meets PM Modi
Rahul Gandhi: अमित शाह यांना गृहमंत्रिपदावरून हटवा; राहुल गांधींची मागणी

NDA प्रवेशासाठी दिल्लीत भेटीगाठी?

7 जुलै 2026

पवारांच्या राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि भाजपचे खासदार विनोद तावडे यांच्यात गुप्त बैठक

22 जुलै 2026

जंतरमंतरवर आंदोलन सुरु असताना शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी संसदेत पंतप्रधान मोदींची भेट घेतली

भेटीत विद्यार्थी आंदोलनावर चर्चा झाल्याचं पवारांनी सांगितलं

23 जुलै 2026

दिल्लीत पार्थ पवार आणि प्रफुल पटेल यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर

27 जुलै 2026

दादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली

27 जुलै 2026

त्याच दिवशी सुप्रिया सुळेंनीही खासदार बजरंग सोनवणे यांच्यासोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली

29 जुलै 2026

तटकरेंनी शाहांपाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत झालेली भेट विकासकामांशी संबंधित असल्याचं तटकरेंनी सांगितल्याचं कळतंय. तर दुसरीकडे अमित शाह आणि सुप्रिया सुळेंच्या भेटीत उपस्थित असलेले पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे यांनीही विकासकामांचा हवाला दिलाय. भाजप नेतृत्त्वानं एनडीए प्रवेशासाठी दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याची अट शरद पवारांना घातल्याची चर्चा आहे.मात्र शरद पवारांनी दादांच्या राष्ट्रवादीतील विलिनिकरण होणार नसल्याचं स्पष्ट केलयं .

दोन्ही राष्ट्रवादीचे नेते पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत विकासाच्या चर्चेसाठी दिल्लीत भेटीगाठी घेतात हे सर्वांसाठी भुवया उंचावणारं आहे. राजकारणात टायमिंगला महत्त्व असतं. आणि संसदेचं अधिवेशन सुरू असताना या भेटींना आलेला वेग पाहता ही सर्व डिलिमिटेशन विधेयकाच्या पाठिंब्यासाठी सुरू असलेली धावपळ आहे की थेट पवारांच्या एनडीए प्रवेशाची नांदी याबाबत सर्वांनाच प्रश्न पडलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com