मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला मिळणार रेल्वेची साथ; नव्या फ्रेट कॉरिडॉरचा मोठा प्लॅन!

Samruddhi Expressway-Railway Link : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या समांतर नवीन रेल्वे मालवाहतूक कॉरिडॉर उभारता येईल का, याची व्यवहार्यता तपासली जात आहे. मार्गामुळे मालाची जलद आणि अधिक क्षमतेने वाहतूक करण्यासाठी पर्याय उपलब्ध होऊ शकतो.
Samruddhi Expressway-Railway Link
Mumbai Nagpur Samruddhi Expressway dedicated rail freight corridor saam tv
Published On
Summary
  • मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला समांतर नवीन रेल्वे मालवाहतूक कॉरिडॉर

  • हा प्रकल्प अद्याप अंतिम मंजूर झालेला नसून सध्या त्याची चाचपणी केली जातेय.

  • वाढवण बंदर आणि जेएनपीएला समृद्धी महामार्गाशी रेल्वे मालवाहतूक नेटवर्कने जोडण्याचा प्रस्ताव

देशातील तिसरा नवीन रेल्वे मालवाहतुकीचा कॉरिडॉर केला जाणार असून त्याची चाचपणी केली जातेय. हा रेल्वे मार्ग नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या समांतर असणार आहे, त्याची चाचपणी केली जातेय, जर मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाची रेल्वे मालवाहतूक नेटवर्कशी संलग्नता झाल्यास देशातील मालवाहतुक अधिक वेगाने होणार आहे. (Mumbai-nagpur Samruddhi Expressway To Get Rail Freight Corridor? Big Plan Under Study)

Samruddhi Expressway-Railway Link
EPFO: नोकरी सोडल्याची तारीख चुकलीय? मग PF क्लेम होईल का? पैसे मिळतील की नाही?

‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर्स’ भारतातील मालवाहतूक क्षेत्रात परिवर्तन घडवणारे ठरलंय. त्यामुळे भारतातील मालवाहतूक क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल घडून आलेत. देशातील प्रमुख औद्योगिक, उत्पादन आणि लॉजिस्टिक्स केंद्रांदरम्यान उच्च-क्षमता असलेली, जलद रेल्वे मालवाहतूक सुविधा उपलब्ध करून देणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे.

Samruddhi Expressway-Railway Link
एका दिवसात किती वेळा ट्रॅफिक चालान आकारलं जातं? काय आहे नियम जाणून घ्या

सध्या या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर नेटवर्कमध्ये दोन प्रमुख मार्ग आहेत. ईस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर सुमारे १,३३७ किमी लांबीचा आहे. हा मार्ग पंजाबमधील ‘न्यू सहनेवाल’ येथून सुरू होतो आणि हरियाणा व उत्तर प्रदेशमार्गे बिहारमधील ‘न्यू सोननगर’ला जोडला जातो. तर दुसरा वेस्टर्न डेडिकेटेड फ्रंट कॉरिडॉर सुमारे १,५०६ किमी लांबीचा आहे. हा रेल्वेमार्ग उत्तर प्रदेशातील ‘न्यू दादरी’ येथून सुरू होतो आणि हरियाणा, राजस्थान व गुजरातमार्गे महाराष्ट्रातील ‘न्यू जेएनपीटी’पर्यंत येतो.

यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात तिसऱ्या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचीही घोषणा करण्यात आली आहे. हा मार्ग पश्चिम बंगालमधील ‘डानकुनी’ येथून सुरू होऊन झारखंड, छत्तीसगड आणि महाराष्ट्रमार्गे गुजरातला जोडला जाणार आहे. महाराष्ट्रात हा नवीन कॉरिडॉर समृद्धी महामार्गाला समांतर जोडता येईल का याची चाचपणी केली जातेय.

महत्त्वाच्या बंदराशी जोडणी

डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर्स नेटवर्कमुळे ‘डबल स्टॅक कंटेनर रेक्स’ देशातील महत्त्वाच्या बंदरांशी थेट जोडले जातील. ज्यामुळे मालवाहतुकीच्या पद्धतीत आणि स्थितीत मोठा बदल झालाय. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर्समुळे केवळ मालगाड्यांचा वेग आणि क्षमताच वाढली आहे. तर विद्यमान रेल्वे नेटवर्कवरील मालवाहतुकीचा ताण कमी करण्यासही मदतदेखील यामुळे झाली आहे. यामुळे प्रवासी गाड्यांच्या परिचालनासाठी अतिरिक्त क्षमता उपलब्ध होते. देशाची लॉजिस्टिक्स कार्यक्षमता, पुरवठा साखळी व आर्थिक विकासाला चालना मिळते, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला यांनी माध्यामांशी बोलताना सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com