

EPFO रेकॉर्डमधील Date of Exit ही पीएफ ट्रान्सफर आणि काही क्लेमसाठी महत्त्वाची नोंद आहे.
चुकीची Exit Date असल्याने PFची रक्कम मिळते का?
Aadhaar-validated UAN असलेल्या पात्र सदस्यांना Date of Leaving ऑनलाइन अपडेट करण्याची सुविधा उपलब्ध
नोकरी बदलताना बहुतेक लोक आपला बायोटाडा, ऑफर लेटर आणि रुजू होण्याची तारीख काळजीपूर्वक तपासतात. पण अनेकदा त्यांच्या EPFO रेकॉर्डमधील 'एक्झिट डेट' म्हणजेच नोकरीचा शेवटचा दिवसाकडे दुर्लक्ष करतात. जर तुमच्या पूर्वीच्या कंपनीने चुकीची एक्झिट डेट नोंदवली असेल किंवा ती अजिबात अपडेट केली नसेल, तर तुम्हाला नंतर तुमचा पीएफ हस्तांतरित करताना किंवा दावा दाखल करताना अडचणी येऊ शकतात. नोकरीच्या नोंदींमधील विसंगती आढळल्यास तुमच्या नवीन कंपनीद्वारे बॅकग्राउंडची पडताळणी करताना प्रश्न निर्माण होऊ शकतो.
नवीन कंपनीमध्ये पार्श्वभूमी पडताळणी प्रक्रियेदरम्यान रोजगारविषयक नोंदींबाबतही प्रश्न उपस्थित होऊ शकतात. ही चूक सुधारण्यासाठी मागील नियोक्त्याकडे प्रत्यक्ष जाण्याची नेहमीच गरज नसते. पात्र EPFO सदस्य त्यांची 'Date of Exit' (सेवेतून बाहेर पडल्याची तारीख) स्वतःच ऑनलाइन अद्ययावत करू शकतात.
EPFO च्या ऑनलाइन प्रणालीद्वारे 'Date of Exit' (सेवेतून बाहेर पडल्याची तारीख) अपडेट करण्यापूर्वी काही अटींची पूर्तता होणे आवश्यक आहे. नोकरी सोडल्यानंतर किमान दोन महिने उलटून गेल्यावरच सदस्य स्वतः ही माहिती अद्ययावत करू शकतात. यासह नोंदवली जाणारी तारीख ही त्याच महिन्यातील असावी ज्या महिन्यासाठी मागील नियोक्त्याने शेवटचे PF योगदान भरले होते का? तुमचा UAN सक्रिय आणि तुमच्या आधारशी जोडलेला असणे आवश्यक आहे. यासह आधारशी लिंक केलेला मोबाईल क्रमांक तुमच्याकडे असणे गरजेचे आहे का, कारण संपूर्ण प्रक्रियेची पडताळणी OTP द्वारे केली जात असते.
तुमच्या UAN आणि पासवर्डचा वापर करून अधिकृत EPFO मेंबर पोर्टलवर लॉग इन करा. त्यानंतर, होम पेजवरील 'Manage' (व्यवस्थापन) विभागात जा आणि 'Mark Exit' हा पर्याय निवडा. पुढील प्रक्रिया करण्याआधी तुमची 'एक्झिट डेट' आधीच नोंदवली गेली आहे का, हे पाहण्यासाठी तुमची 'सर्व्हिस हिस्ट्री' (सेवेचा तपशील) तपासा.
जर एखादी तारीख आधीच नोंदवलेली असेल आणि ती चुकीची असेल, तर तिची खात्री केल्याशिवाय नवीन तारीख नोंदवू नका. योग्य तारखेची पडताळणी तुमच्या वेतन-चिठ्ठी (सॅलरी स्लिप), कार्यमुक्ती पत्र (रिलीव्हिंग लेटर) आणि रोजगाराशी संबंधित इतर कागदपत्रांशी करून घ्यावी.
जर ऑनलाइन सुविधेद्वारे बाहेर पडण्याच्या तारखेत आवश्यक बदल करता येत नसतील, तर तुम्हाला तुमच्या आधीच्या कंपनीशी संपर्क साधावा लागेल. जर कंपनीने अनेक दिवस किंवा आठवडे प्रतिसाद दिला नाही, तर तुम्ही EPFO कडे तक्रार नोंदवू शकता.
EPFO कडे नोंदवलेली नोकरी सोडल्याची तारीख ही केवळ एक सामान्य माहिती नाही. तर तुमचा पीएफ (PF) हस्तांतरित करण्यासाठी आणि त्यातील रक्कम काढण्यासाठी ती अत्यंत आवश्यक आहे. जर ही तारीख चुकीची असेल, तर तुम्ही तुमचे पैसे काढू शकणार नाहीत. याशिवाय जर तुमच्या जुन्या आणि नवीन नोकरीच्या कालावधीत काही विसंगती किंवा तारखांचे ओव्हरलॅप (एकाच कालावधीत दोन नोकऱ्यांची नोंद असणे) आढळले, तर नवीन कंपनीच्या 'बॅकग्राउंड व्हेरिफिकेशन' (पार्श्वभूमी पडताळणी) प्रक्रियेदरम्यान समस्या निर्माण होऊ शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.