Maharashtra Politics: माझी हत्या करण्याचा प्रयत्न, धैर्यशील मोहिते पाटील मास्टरमाईंड; भाजप नेत्याचा खळबळजनक दावा
Dhairyasheel Mohite PatilSaam tv

Maharashtra Politics: माझी हत्या करण्याचा प्रयत्न, धैर्यशील मोहिते पाटील मास्टरमाईंड; भाजप नेत्याचा खळबळजनक दावा

BJP Leader Ram Satpute On Dhairyasheel Mohite Patil: भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी आपल्या हत्येचा कट रचण्यात आल्याचा खळबळजनक दावा केला. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे मास्टरमाईंड असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
Published on

Summary -

  • भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांचा खळबळजनक दावा

  • माझ्या हत्येचा कट रचला गेला असल्याचा दावा त्यांनी केला

  • खासदार धैर्यशील मोहिते पाटील मास्टरमाईंड असल्याचा आरोप

  • कॉन्ट्रॅक्ट किलिंगद्वारे हत्या करण्याचा प्रयत्न असल्याचे विधान

'माझ्या हत्येच्या कटाचे मास्टरमाईंड खासदार धैर्यशील मोहिते पाटील आहेत' असा खळबळजनक दावा भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी केला. त्यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर केलेल्या आरोपामुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली. 'माझी हत्या कॉन्ट्रॅक्ट किलिंग पद्धतीने करण्याचा प्रयत्न आहे. माळशिरस तालुक्यात गेल्या ३ दिवसांपासून पोलिस आहेत. याप्रकरणी काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे', अशी माहिती राम सातपुते यांनी दिली.

राम सातपुते यांनी आरोप केला की, 'माझ्या हत्येचा कट रचण्यात खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि अर्जुनसिंह मोहिते पाटील मास्टरमाईंड असतील. माझ्या हत्येच्या कटासंदर्भात पोलिसांना अगोदरच माहिती मिळाली. त्यानुसार गेल्या ३ दिवसांपासून पोलिस माळशिरस तालुक्यात तळ ठोकून आहेत. पोलिसांनी काही व्यक्तींना ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली आहे. कॉन्ट्रॅक्ट किलिंग करण्याचा प्रकार होता.'

तसंच 'आपल्या हत्येच्या कटात कोण- कोण असू शकते यासंदर्भात मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांना पत्र दिली आहे', असं राम सातपुते यांनी सांगितले.

Maharashtra Politics: माझी हत्या करण्याचा प्रयत्न, धैर्यशील मोहिते पाटील मास्टरमाईंड; भाजप नेत्याचा खळबळजनक दावा
Maharashtra Politics: ठाकरे भाजपसोबत, तर शिंदे पवारांसोबत जाणार; 'या' नेत्याच्या दाव्याने राजकारणात खळबळ

भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचला गेला असा दावा ग्रामविकास मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केला होता. यानंतर राम सातपुते यांनी त्यांच्या हत्येच्या कटाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. जयकुमार गोरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले होते की, 'माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचला गेला होता. जे मला गुंड म्हणत आहे, ते सर्वात मोठे गुंड आहेत. माळशिरसमध्ये बघा कुठल्या पद्धतीचं वातावरण आहे. अनेक कार्यकर्त्यांना मारहाण झाली.'

Maharashtra Politics: माझी हत्या करण्याचा प्रयत्न, धैर्यशील मोहिते पाटील मास्टरमाईंड; भाजप नेत्याचा खळबळजनक दावा
Political News : शिंदेसेनेच्या विजयी उमेदवाराच्या कारवर हल्ला, ठाकरेसेनेच्या जिल्हा प्रमुखासह १० ते १२ जणांवर गुन्हा दाखल

जयकुमार गोरे यांनी पुढे सांगितले की, 'ज्या पद्धतीचे भाजपला मत मिळाली आहेत ते बघून भाजप कार्यकर्त्यांना मारहाण आणि दमबाजी झाली. त्याठिकाणी माजी आमदार राम सातपुते यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. त्यातून त्यांच्या हत्येचा कट होता अशी माहिती समोर येत आहे. पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहेत. हा कट कोणी रचला होता ते भविष्यात पोलिस तपासात समोर येईल. कोण गुंड आहे? हे समोर येईलच. त्यानंतर आपण चर्चा करू.'

Maharashtra Politics: माझी हत्या करण्याचा प्रयत्न, धैर्यशील मोहिते पाटील मास्टरमाईंड; भाजप नेत्याचा खळबळजनक दावा
Pune Politics: पुण्यात भाजपकडून मोठी कारवाई, ६९ पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com