विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी घेतला मोठा निर्णय
बाळ माने, देवयानी डोनगावकर आणि कृष्णा डोनगावकर यांची पक्षातून हकालपट्टी
उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे पक्षाकडून कठोर कारवाई
या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
राज्यात विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत मोठी राजकीय घडामोड घडली आहे. उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला. शिवसेनेतून ३ बड्या नेत्यांची तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली. आज विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. शेवटच्या क्षणापर्यंत अनेक जागांवर नाट्यमय घडामोडी घडल्या. शिवसेनेच्या काही उमेदवारांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे त्यांच्याविरोधात पक्षाकडून कारवाई करण्यात आली आहे.
विधान परिषद निवडणुकीचे तिकीट मिळावे यासाठी अनेक नेते इच्छुक होते. पण पक्षाकडून तिकीट न मिळाल्यामुळे नाराजीनाट्य पाहायला मिळाले. अशातच महाविकास आघाडी आणि महायुतीमधील अनेक नेत्यांनी उमेदवारी न मिळाल्यामुळे बंडखोरी केली. महायुतीला बंडखोरीचा फटका बसणार होता पण त्यांना बंडखोरी रोखण्यात यश आले. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये पक्षाकडून ज्यांना उमेदवारी दिली होती त्यांनी अचानक निवडणुकीतून माघार घेतली त्यामुळे मविआला झटका बसला.
शिवसेना ठाकरे गटाच्या सर्वाधिक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधान परिषद मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाने बाळ माने यांना तिकीट दिले होते. पण त्यांनी शेवटच्या क्षणी निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे पक्षाकडून त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. ठाकरेसेनेतून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षाच्या सर्व पदावरून त्यांना काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे बाळ माने यांना धक्का बसला.
तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर -जालना मतदारसंघातून देवयानी डोनगावकर यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली होती. त्यांनी देखील अचानक आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे ठाकरेसेनेला मोठा धक्का बसला. निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे देवयानी डोनगावकर आणि कृष्णा डोनगावकर यांची पक्षातून हकालपट्टी केली. शिवसेना ठाकरेसेनेतून ३ बड्या नेत्यांची हकालपट्टी करण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.