MLC Election: कोणत्या ५ मतदारसंघात कशी लढत, उमेदवार कोणते? माघार कुणाची? शिक्षक-पदवीधरची A टू Z माहिती

MLC Election 2026 Update: राज्यातील ५ पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी येत्या २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी कोणत्या पक्षाकडून कोणता उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरला हे घ्या जाणून...
MLC Election: कोणत्या ५ मतदारसंघात कशी लढत, उमेदवार कोणते? माघार कुणाची? शिक्षक-पदवीधरची A टू Z माहिती
MLC Election 2026Saam Tv
Published On: 
  • महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६ उमेदवारांची संपूर्ण यादी समोर

  • महाराष्ट्रात ५ शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी होणार निवडणूक

  • महायुती आणि महाविकास आघाडीतील बंडखोरीचे निवडणुकीवर परिणाम होणार

  • २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून २७ ऑक्टोबरला निकाल जाहीर होईल

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या ५ जागांसाठी २७ ऑक्टोबर रोजी निवडणुका होणार आहे. या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ३ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघासाठी ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी ६ ऑक्टोबर रोजी सर्व राजकीय पक्षांच्या इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता.

या निवडणुकीमध्ये महायुतीला बंडखोरीचे ग्रहण लागल्याचे पाहायला मिळाले. अनेकांनी आपला उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. या पाचही मतदारसंघासाठी २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. तर २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे. कोणत्या मतदारसंगात कशी लढत होणार आहे? कोणत्या पक्षाचा कोणता उमेदवार निवडणुकीच्या रिंगणार आहे आणि कुणी निवडणुकीतून माघार घेतली? हे आपण जाणून घेणार आहोत...

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक -

पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघातील बंडखोरी शमवण्यात महायुती आणि महाविकास आघाडीला यश आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे भैय्या माने यांनी पुणे पदवीधर मतदारसंघातून दाखल केलेला अर्ज मागे घेतला. आता भाजपच्या उमेदवार स्मिता जाधव यांचा प्रचार करणार आहोत असं भैय्या माने यांनी म्हटलंय. तर शिक्षक मतदारसंघातुन उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या मंगेश चिवटे यांनी देखील त्यांच्या प्रतिनिधींच्या मार्फत त्यांचा निवडणूक अर्ज मागे घेतलाय. भाजपने उमेदवारी दिलेल्या कौस्तुभ गावडे यांच्यासमोरील अडचणी यामुळे दूर होणार आहेत.

तर महाविकास आघाडीला देखील बंडखोरी शमवण्यात यश आलं. शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसचे जयंत आसंगावकर उमेदवार असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अश्विनी कदम यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र अश्विनी कदम यांनी आज अर्ज माघारी घेत जयंत आसंगावकर यांच्यासाठी काय करणार असल्याचं म्हटलं. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक आता महाविकास आघाडी विरोध महायुती अशी असणार आहे. त्यामुळे पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात चुरस होणार आहे.

MLC Election: कोणत्या ५ मतदारसंघात कशी लढत, उमेदवार कोणते? माघार कुणाची? शिक्षक-पदवीधरची A टू Z माहिती
MLC: राज्याला मिळाले 6 नवे आमदार; विधान परिषदेत पार पडला शपथविधी सोहळा

छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक -

मराठवाडा पदवीधर मतदारसंघात महायुतीकडून आमदार सतीश चव्हाण, ठाकरेच्या शिवसेनेचे दिलीप घुगे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतापसिंह पाटील यांच्यात प्रमुख लढते होणार आहे. महाविकास आघाडीतील ठाकरे शिवसेनेचे दिलीप घुगे आणि पवारांच्या राष्ट्रवादीचे पाटील यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवला. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. भाजपाचे बंडखोर नेते एम के देशमुख यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला.

MLC Election: कोणत्या ५ मतदारसंघात कशी लढत, उमेदवार कोणते? माघार कुणाची? शिक्षक-पदवीधरची A टू Z माहिती
MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक -

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत बंडखोरीची चूरस चांगलीच वाढली आहे. भाजपचे सुधाकर कोहळे तर काँग्रेसचे अभिजित वंजारी यांच्यात मुख्य लढत होणार आहे. मात्र भाजपचे माजी आमदार अनिल सोले यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने भाजपसाठी अडचणीचे ठरणार आहे. तर दुसरीकडे, महाविकास आघाडीतही बंडखोरीचं संकट कायम आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निलेश कराळे यांनी माघार न घेतल्याने काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अभिजीत वंजारी यांच्यासमोरचं आव्हान वाढण्याची शक्यता आहे. मागच्यावेळी जवळपास ७००० मते कराळे यांनी घेतली होती. तर यात बीएसपी तिकीट नाकारल्यानंतर अपक्ष राहिलेलं संजय थुल हे सुद्धा महत्वाची भूमिका निभावणार आहेत. यासोबत वंचितचे मंगेश वानखेडे हे सुद्धा मैदानात असणार आहे.

MLC Election: कोणत्या ५ मतदारसंघात कशी लढत, उमेदवार कोणते? माघार कुणाची? शिक्षक-पदवीधरची A टू Z माहिती
MLC Election: पुणे पदवीधर मतदारसंघात ट्विस्ट, भाजपने स्मिता जाधवांना उतरवलं; शरद लाडांच्या हालचालींनी राजकीय वर्तुळात खळबळ

अमरावती शिक्षक मतदारसंघाची निवडणूक -

अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये महायुतीतून ३ बंडखोरांचे अर्ज मागे घेतले. पोहरादेवी येथील महंत सुनील महाराज चव्हाण, रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या प्रीती रेवने, प्रहार सामाजिक संघटनेचे नितीन आगे यांचे उमेदवारी अर्ज मागे घेतला. अमरावती शिक्षक मतदारसंघ महायुतीतून शिंदेसेनेच्या वाट्याला आला. विद्यमान आमदार किरण सरनाईक यांना शिंदेसेनेने उमेदवारी दिली. अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी २६ उमेदवार रिंगणात आहेत. महायुतीतील ४ उमेदवार बंडखोरीवर कायम आहेत. बंड क्षमवण्यात पक्षश्रेष्ठींना अपयश आले.

महायुतीतील या ४ उमेदवार बंडखोरी -

१.संगीता सचिंद्र शिंदे-बोंडे (भाजप खासदार अनिल बोंडे यांच्या भगिनी)

२.शेखर भोयर (भाजप, आमदार राजेश वानखडे यांचे मेहुणे.)

३. श्रीकांत देशपांडे माजी आमदार तथा शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी)

४. सुमित पवार, भाजपा पदाधिकारी

महाविकास आघाडीचे उमेदवार-

१. अदिती ऋषिकेश पोहरे (काँग्रेस)

२. दत्तात्रय लहाने (उद्धव ठाकरे गट)

MLC Election: कोणत्या ५ मतदारसंघात कशी लढत, उमेदवार कोणते? माघार कुणाची? शिक्षक-पदवीधरची A टू Z माहिती
MLC Election: पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीआधी मोठी घडामोड, ७ उमेदवारांचे अर्ज बाद, आता रिंगणात किती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com